सुमारे 400 धोकादायक वीज खांबांची टांगती तलवार
गुहागर, ता. 16 : तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका महावितरणाला बसला आहे. सडलेल्या खांबांबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी गुहागरच्या नैसर्गिक आपत्ती ग्रुपवर झळकत आहेत. यामुळे सुमारे 400 धोकादायक वीज खांबांच्या आपत्तीची टांगती तलवार सध्या गुहागर तालुक्यावर आहे. Dangerous power poles
तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पाश्वभूमीवर गुहागर तहसिलदार प्रतिभा वराळे यानी तालुक्याचा नैसर्गिक आपत्ती हा स्वतंत्र ग्रुप तयार केला आहे. यामध्ये तालुक्यातील तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, सर्व विभागाचे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आहे. तालुक्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती व त्यावर तत्काळ निवारण करण्याच्या सूचना तहसिलदारांकडून दिल्या जात आहेत. परिणामी संबंधित विभागही यावर तातडीने कार्यवाही करत असल्याने हा ग्रुप सध्या नैसर्गिक आपत्तीकाळात महत्वाचा ठरला आहे. पाऊस सुरू झाल्यापासून वीज वाहीन्यांवर वृक्ष कोसळून नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत. अशामध्ये अनेक गावातून सडलेले व वाकलेल्या धोकादायक वीज खांबांचे फोटो या ग्रुपवर झळकत आहेत. अनेक ठिकाणामधून ग्रामस्थांच्या अंगणामधील व वाडीवस्तीतील सडलेले वीज खांब धोक्याची गांभिर्यता दाखवून देत आहेत. Dangerous power poles
सडलेल्या वीज खांबांच्या फोटोबरोबर वीज खांब बदलण्याबाबत वर्षभर पाठपुरावा करूनही महावितरण लक्ष देत नसल्याच्याही आवर्जून पोस्ट पडत आहेत. यामुळे तालुक्यातील सडलेल्या वीज खांबांचा विषय गंभीर बनला आहे. गुहागर महावितरण विभागाकडून घेतलेल्या अधिक माहितीमध्ये तालुक्यात सुमारे 400 वीज खांब धोकादायक आहेत. यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये इतर नूकसानीपेक्षा सडलेल्या वीज खांबांची आपत्तीच मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. Dangerous power poles
साहित्याच्या वाढीव दरामुळे अडले काम – उपअभियंता गणेश गलांडे
सडलेल्या व धोकादायक वीज खांबांबाबत गुहागर महावितरणचे उपअभियंता गणेश गलांडे यांनी बोलताना वीज खांब बदलण्यासाठी महावितरणकडून आवश्यक प्रस्ताव पाठवून काम करण्याची निविदाही बाहेर पडली आहे. परंतू ऑक्टोबर 2021 पासून वाढीव इंधन दरामुळे सहाजिकच साहित्याचे दरही वाढले आहेत. Dangerous power poles
यामुळे महावितरणच्या जुन्या डीएसआर प्रमाणे काम करण्यात ठेकेदार तयार नाही. आम्हाला साहित्याचे दर वाढवून मिळावे म्हणून ठेकेदारांकडून मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप महावितरणचा सुधारित साहित्य दराप्रमाणे डीएसआर तयार केलेला नाही. महिना अखेरपर्यंत याबाबत महावितरणाकडून कार्यवाही होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळातील बदलेले खांब मुरले कोठे
2020 मध्ये गुहागर तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला होता. या निसर्ग चक्रीवादळामध्ये सरकारकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया करण्याअगोदर प्रथम आलेली आपत्ती बाजुला करण्याचे काम महावितरणाकडून करण्यात आले. तालुक्यात महावितरणने मोठ्या प्रमाणात वीज खांब व वीज वाहिन्यांची दुरूत्ती केली होती. याच कामामध्ये अनेक सडलेले व धोकादायक वीज खांब बदलले गेले आहेत. मात्र ते बदलले वीज खांब गेले कुठे, खेडोपाड्यातील सडलेले व धोकादायक वीज खांब दोन वर्षाचे नाहीत तर मागील अनेक वर्षापासूनचे असल्यांची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे. दोन वर्षात वीज खांब सडत नाहीत. मग या सडक्या वीज खांबांच्या तक्रारी पाहता निसर्ग चक्रीवादळातील बदलेले खांब मुरले कोठे, असे म्हणावे लागत आहे. यामुळे गुहागर तालुक्यातील सडक्या वीज खांबांच्या या प्रश्नांकडे महावितरणचे वरिष्ठ लक्ष देतील का, असा सवाल तालुक्यातील ग्रामस्थ करत आहेत. Dangerous power poles