पांगारी तर्फे वेळंब, या वर्षी ही बांधले 2 विजय बंधारे
गुहागर, ता. 07 : पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत ग्रामपंचायत पांगारी तर्फे वेळंबच्या वतीने ‘मिशन बंधारे २०२३’ उपक्रमांतर्गत दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी गावातील नदीवर २५ मीटर लांबीचे २ विजय बंधारे बांधण्यात आले. महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत गेले दिड दशक म्हणजेच १५ वर्ष पाण्यासाठी श्रमदानाचा पांगारी तर्फे वेळंबच्या ग्रामस्थांचा हा अखंडीत सिलसिला सुरू आहे. त्यामुळे पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी ग्रामस्थांचे भरभरून कौतुक केले. Dams constructed at Pangari Welamb
दरवर्षी डिसेंबर जानेवारी महिण्यात ग्रामस्थ श्रमदानाने हे बंधारे बांधतात. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी यावर्षी दिवाळीपूर्वीच ‘मिशन बंधारे’ मोहिम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गुहागर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यातच या मिशन बंधारे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत पांगारी तर्फे वेळंबच्या ग्रामस्थांनी यावर्षीही उत्सफूर्तपणे सहभाग घेत हे 25 मीटर लांबीचे दोन विजय बंधारे बांधून पूर्ण केले. या बंधा-यामुळे नळपाणी पुरवठ्याच्या विहिरीच्या पाण्याची पातळी कायम राहण्यास व नदीशेजारील नारळ सुपारीच्या बागांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. या बंधा-यामुळे लाखो लिटर वाहून जाणारे पाणी अडले आहे. यावेळी सरपंच विष्णू वीर यांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी भरपूर प्रतिसाद दिला. Dams constructed at Pangari Welamb
यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर, कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे, सरपंच विष्णू वीर, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी शरद भांड, उपसरपंच सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य विद्या खांबे, सुजाता खांबे, खांबेवाडीचे वाडीप्रमुख शिवाजी खांबे, भागोजी गिजे, अनंत खांबे, ग्रामसेवक विनोद तोडणकर, अंगणवाडी सेविका सोनाली खांबे, मनाली गिजे, शुभांगी वणे, कृषी सहाय्यक श्री. आंब्रे, अनुराधा खांबे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री.जाधव, खांबेवाडी, तांबेवाडी, फौजदारवाडी, गिजेवाडीतील अनेक ग्रामस्थ तसेच मोठ्या प्रमाणात महिलांनीही श्रमदान केले. Dams constructed at Pangari Welamb