गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी मध्ये दही हंडी उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने मुलांना घेऊन ३ थरांचा मनोरा रचत दही हंडी फोडण्यात आली. Dahi Handi festival in Tavasal

दही हंडी उत्सवात सर्वांच्या घरांमध्ये जाऊन दही लुटण्यात आले. गावांतील चाकरमानी कामानिमित्ताने मुंबई, पुणे शहरात वास्तव्यास असल्याने ग्रामस्थ व युवा तरुणांची कमी जानवत असते. यासाठी गावातील महिला मंडळ खांद्यावर खांदा लावून मदत करतात. हा उत्सव अशाप्रकारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. Dahi Handi festival in Tavasal

