• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरसीसीच्या माध्यमातून सौरभ रावणांग याला सायकलभेट

by Guhagar News
September 9, 2025
in Old News
124 2
0
Cycle visit through RCC
244
SHARES
698
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याकडून आरसीसीच्या माध्यमातून

रत्नागिरी, ता. 09 : विविध सायकलिंग तसेच रनिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवणारा निवळी येथील सायकलपट्टू, धावपट्टू शेतकरीपुत्र सौरभ रावणांग याला राज्य कृषी मूल्य आयोग व कार्यकारी अध्यक्ष (मंत्री दर्जा) पाशा पटेल यांच्या हस्ते एका कार्यक्रमात रेसर सायकल देण्यात आली, सोबतच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे या सायकलची जबाबदारी देखील देण्यात आली. Cycle visit through RCC

या सायकल साठी पालकमंत्री उदय सामंत यांनी  निधी उपलब्ध करून दिला. रेसर सायकल नाही म्हणून कोकणातील सायकलपटू चांगल्या स्पर्धाना मुकायला नकोत. या विचाराने हा निधी उपलब्ध करून दिल्याचं यावेळी सन्मानीय पालकमंत्री महोदयांनी नमूद केलं आणि ही सायकल घेऊन कोकणातील सायकलपटू लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसावेत, असा आशावाद व्यक्त केला. येथे आयोजित बांबू परिषदेत ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये ही सायकल प्रदान करण्यात आली. Cycle visit through RCC

गेले तीन चार  वर्षे रत्नागिरी सायकलिस्ट क्लब जिल्ह्यामध्ये आणि पर्यायाने कोकणामध्ये  सायकलिंग वाढवण्यासाठी कार्यरत आहे. क्लब च्या माध्यमातून सौरभ सारखे  सायकलपटू ही सायकल आता वापरू शकतील आणि  या  दर्जेदार सायकल मुळे  त्यांच्या  मेहनतीला नवा वेग येईल  आणि कामगिरी नक्की उंचावेल.  असे यावेळी क्लब च्या माध्यमातून सांगण्यात आले. Cycle visit through RCC

या निमित्ताने रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने असेच दर्जेदार खेळाडू शोधत राहावेत, त्यांच्याकडून रिझल्ट मिळावा यासाठी त्यांना ट्रेन करावे, चांगले रिझल्ट मिळाल्यास नक्की अशा रेसर सायकल जास्त प्रमाणात कोकणामध्ये  आपण वितरित करू असे देखील यावेळी पालकमंत्री महोदयांनी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सभासद आणि३०० हून अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमुळे सायकलिंग तर कोकण कोस्टल मॅरेथॉनमुळे रनिंगमध्ये माझी लक्षणीय सुधारणा झाल्याचे यावेळी सौरभ रावणांग याने सांगितले. Cycle visit through RCC

Tags: Cycle visit through RCCGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet61
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.