सव्वा वर्षापूर्वी सुरु केलेल्या क्रायो गॅसचे कारोनाच्या लढाईत योगदान
मुझफ्फर खान, चिपळूण
लोटे एमआयडीसीतील क्रायो गॅस या कंपनीतून तयार होणारा ऑक्सिजन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रूग्णालयांना पुरवले जात आहे. लोटे परिसरातील तिघा तरूणांनी सुरू केलेला हा प्रकल्प जिल्ह्यातील कोरोनाबाधितांसाठी खर्या अर्थाने प्राण देणारा ठरला आहे. Oxygen produced by CryoGas Air India Ltd. at Lotte MIDC is currently being supplied to hospitals in Ratnagiri district. The project, started by three young men from the Lotte area, has proved to be a real life-saver for the Corona victims in the district.


नोकरदार बनले उद्योजक
जिल्ह्यातील विविध प्रकारच्या उद्योगात ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालवण्यासाठी ऑक्सिजन वापरला केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांची ऑक्सिजनची गरज ओळखून आवाशी येथील सतीष आंब्रे, शेल्डी येथील सचिन आंब्रे आणि लोटेतील सचिन चाळके या तिघा तरूणांनी जानेवारी 2020 मध्ये लोटे एमआयडीसीत ऑक्सिजन निर्मितीचा क्रायो गॅस (CryoGas Air India Pvt. Ltd.) हा प्रकल्प उभारला. हे तिघे तरूण पूर्वी लोटेतील एका कंपनीत कामाला होते. उद्योजकांची गरज लक्षात घेवून त्यांनी कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला. बँकेचे कर्ज आणि स्वः गुंतवणूकीचे नियोजन करून तीन कोटीचा गॅस निर्मितीचा प्रकल्प त्यांनी लोटे एमआयडीसीत सुरू केला. लोटेतील कारखानदार आणि जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना ते ऑक्सिजनचा पुरवठा करत होते. सुरवातीला शासकीय रूग्णालयांना फार कमी प्रमाणात ऑक्सिजन लागत होते त्यामुळे उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर क्रायो गॅस कंपनीचा भर होता.
जिल्ह्यातील रूग्णालयांना 10 टन ऑक्सिजन
मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर शासकीय रूग्णालयात बेड आणि ऑक्सिजन कमी पडू लागले. त्यानंतर क्रायो गॅस कंपनीने अन्य औद्योगिक आस्थापनांना ऑक्सिजन पुरवण्याचे बंद केले. प्रति दिन दहा टन ऑक्सिजन तयार करून त्याचा पुरवठा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू केला. Crogas Air India Pvt. Ltd. generating 10 tons of oxygen per day and supplying it to save the lives of the corona victims in the district.
मध्यंतरी ऑक्सिजन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळत नसल्याने क्रायो गॅसमधुन ऑक्सिजनचे उत्पादन कमी झाले होते. मात्र ऑक्सिजनची आवश्यतकता लक्षात घेवून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिंदाल कंपनीकडून क्रायो गॅस कंपनीला ऑक्सिजन उत्पादनासाठी आवश्यक द्रव पदार्थ उपलब्ध करून दिला. त्यामुळे क्रायो गॅस कंपनीतून आता दिवसा 8 ते 10 टन ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जात आहे. रत्नागिरी येथील ग्रामीण रूग्णालय, चिपळूणातील कामथे उपजिल्हा रूग्णालय, खेड येथील कळंबणी उपजिल्हा रूग्णालय, दापोली, गुहागर सह जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयांना या कंपनीतून आता ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.


का लागतो शुध्द ऑक्सिजन
ऑक्सिजन श्वासावाटे आत घेतला जातो. तो फुफ्फुसातून रक्तात प्रवेश करतो आणि रक्तावाटे पेशींपर्यंत पोहचतो. तिथे ग्लुकोजसोबत त्याची प्रक्रिया होते. कोरोना किंवा अन्य संसर्गजन्य आजारात सुक्ष्मजीवाचा संसर्ग फुफ्फुसात वाढला तर रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होतात. अशावेळी नेहमीसारखा श्वासावाटे घेतला जाणारा ऑक्सिजन पुरेसा ठरत नाही म्हणून रूग्णांना शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.