• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

घरी असूनही मुलगा देवू शकला नाही खांदा

by Ganesh Dhanawade
April 27, 2021
in Old News
16 0
0
घरी असूनही मुलगा देवू शकला नाही खांदा

खोडदे : कोरोनाग्रस्त महिलेवर माणुसकीतून अंत्यसंस्कार करणारे कोविड योध्दे

31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खोडदेत प्रशासनाने केले अंत्यसंस्कार, माणुसकीचा आदर्श

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे येथे कोरोनाग्रस्त वृध्देचे निधन झाले. दुर्दैवाने दोन्ही मुले कोरोनाग्रस्त असल्याने आपल्या आईच्या अखेरच्या प्रवासात मुलांना खांदा देता आला नाही. अशा कठीण प्रसंगात आपुलकीच्या भावनेने ग्रामपंचायत प्रशासन मदतीला धावले. सरपंच, उपसरपंचासह तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत लिपिक आणि अन्य एक कर्मचारी यांनी सदर महिलेवर श्रध्दापुर्वक अंत्यसंस्कार केले. या आठजणांनी कोरानाच्या संकटातही माणुसकीचे दर्शन देवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.  
In Khodade (tal. Guhagar) a old women died. Due to Corona her both sons  could not be cremated. In this  difficult situation, the Gram Panchayat Covid Warriors rushed with humanity. They Created New Ideal.

देशात, राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाने रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हातपाय पसरले आहेत. जिल्हावासीयांना या महामारीत अनेक वेदनादायी प्रसंग अनुभवावे लागत आहेत. अशीच एक घटना गुहागर तालुक्यातील खोडदे गावात घडली. येथील एका वृद्ध महिलेचे कोरोनाने निधन झाले. सदर कोरोनाग्रस्त महिला गृह विलगीकरणात होती. तिथेच तिचे निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा रुग्णालयात कोरोनाशी लढत आहे. तर धाकटा मुलगाही कोरोनामुळे गृह विलगीकरणात आहे. अशा कठीण परिस्थितीत मृतदेहावर अंतिम संस्कार कोणी आणि कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला. आपल्या समोर देवाघरी गेलेल्या आईच्या मृतदेहावर आपण अंत्यसंस्कार करू शकत नसल्याच्या वेदना धाकटा मुलगा अनुभवत होता. तर रुग्णालयात असणाऱ्या मोठ्या मुलग्याला आपली आई आपल्याला सोडून गेली आहे याची माहितीसुध्दा नव्हती. अशा प्रसंगात कोरोनाग्रस्त आईवर अंत्यसंस्कार करायला कोण पुढे येणार याची विवंचना होती. पण सरपंच, उपसरपंचासह स्थानिक प्रशासनाने अशा दु:खद प्रसगांगातही मायेचा हात या कुटुंबाला दिला.

खोडदे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महेंद्र निमकर, तलाठी आनंद काजरोळकर, पोलिस पाटील महेश भाटकर, सरपंच प्रदीप मोहिते, उपसरपंच लवेश पवार, कोतवाल प्रकाश बोडेकर, ग्रामपंचायत लिपिक नितीन मोहिते, शिपाई वैभव निवाते या आठ जणांनी मृतदेहावर श्रद्धापुर्वक अंतिम संस्कार केले. खोडदे गावाची स्मशानभूमी सुमारे १.५ कि.मी. दूर असल्याने तिथपर्यंत प्रेत न्यायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी गावातील एक छोट्या टेम्पोत प्लास्टिक मध्ये गुंडाळून मृतदेह ठेऊन स्मशानभूमीत आणला. स्थानिक मंडळींनी सरण रचून, रॉकेल टाकून ठेवले होते. पोलीस पाटील महेश भाटकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथून पीपीई कीट आणले. ग्रामसेवक महेंद्र निमकर यांनी पिपीई किट घालून एका बाजूने  तर दुसऱ्या बाजूने प्रकाश बोडेकर, वैभव निवाते यांनी प्रेतास खांदा दिला. शेवटी तलाठी आनंद काजरोळकर यांनी मृतदेहास अग्नी दिला.
कोरोनाने माणसातली माणूसकी संपत असल्याची अनेक उदाहरणे आज तालुक्यात घडत आहेत. गुहागर नगरपंचायत कोरानाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करते असे समजल्यावर अनेकांनी आपली जबाबदारी टाळत  कोरोनाने मृत पावलेल्याचे देह नगरपंचायतीच्या ताब्यात देण्याचीही तयारी केली होती. मात्र खोडदे ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंचांसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी स्वत:हून पुढे आले.  त्यांनी निभावलेली ही भूमिका केवळ कर्तव्य भावनेपुरती मर्यादित राहत नसून मानवतेची साक्ष पटवून देणारी आहे. या आठजणांनी जपलेल्या माणुसकीचा आदर्श तालुक्यातील अन्य ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीनी घेतला पाहिजे.

Tags: AdministrationBreaking NewsCoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19FuneralGram PanchayatGuhagarGuhagar NewsHumanityIdealLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiअंत्यसंस्कारकोरोनाकोरोना बातम्यागुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.