गुहागर : 1 ते 9 वयोगटातील 29 बालके बाधीत
दृष्टीक्षेपात…
गुहागर तालुक्यातील 68 गावांमध्ये 778 बाधित
37 गावांमधील 108 पेक्षाजास्त कुटुंबे कोरोनाग्रस्त
18 वर्षाखालील 69 मुलांना कोरोना
गुहागर, ता. 4 : एका महिन्यात गुहागरमधील कोरोनाबाधितांची संख्या 700 ने वाढली आहे. आज तालुक्यातील 68 गावांमध्ये 778 कोरोनाग्रस्त आहेत. गुहागर नगरपंचायत क्षेत्र आणि चिंद्रावळे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व वाड्यांमध्ये कोरोना पसरला आहे. तर कोतळुकमधील एका वाडीतून कोरोनाने दुसऱ्या वाडीत प्रवेश केला आहे. आजच्या बातमीमध्ये 3 मे रोजी आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालाचे विश्र्लेषण दिले आहे. In One Month Corona Patient Count increased with 700. 778 patiens in 68 villeges. Guhagar Nagar Panchayat is HOTSPOT in Second Wave. In this News we read Covid Report Analysis of Guhagar Taluka.
कुटुंब होत आहेत बाधित
दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे कुटुंब बाधित होऊ लागली आहेत. घरातील एखाद्या व्यक्तीने कोरानाच्या लक्षणाकडे दुर्लक्ष केले किंवा लक्षणे समजलीच नाहीत तर संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त होत आहे. आज गुहागर तालुक्यातील 37 गावांमधील 105 कुटुंबे कोरोनाग्रस्त आहेत. गुहागर शहरात सर्वाधिक 17 कुटुंबे, पालपेणे 12 कुटुंबे तर कोतळुकमध्ये 10 कुटुंबे बाधित आहेत. त्यामुळे घराबाहेर न पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकही बाधित होत आहेत. तालुक्यात 60 वर्षावरील कोरोनाग्रस्तांची संख्या 140 आहे. In Second Wave Families are infected fastly. Today 107 famillies from 37 Villages suffering.
लहान मुलांनाही होतय कोरोना
कुटुंब बाधित होत असल्याने लहान मुलेही कोरोनाच्या संसर्गात सापडत आहेत. आज 18 वर्षाखालील 69 मुलांना कोरोना झाला आहे. त्यामध्येही वय वर्ष 1 ते 9 मधील मुलांची संख्या 29 आहे.
गुहागर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट
पहिल्या लाटेत शृंगारतळी परिसरात कोरोनाने थैमान घातले होते. आता कोरोनाचा मोर्चा गुहागर शहराकडे वळला आहे. शहरातील प्रत्येक भागात कोरोनाचे रुग्ण आहेत. शहरात 126 कोरोनाग्रस्त आहेत.
तालुक्यातील अन्य ठिकाणची स्थिती
संपूर्ण चिंद्रावळे गाव कोरोनाच्या संसर्गाने पछाडले आहे. सध्या 69 ग्रामस्थ कोरोनाबाधित आहेत. पालपेणे (56), कोतळूक (50), मध्येही कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त आहे. कोतळुकमधील एका वाडीत एप्रिल महिन्याच्या सुरवातीला कोरोनाचे रुग्ण वाढु लागले. मात्र त्या वाडीवर नियंत्रण ठेवण्यात सर्वजण यशस्वी झाले. आता एप्रिल महिन्याच्या अखेरीत दुसऱ्या वाडीत कोरोनाने शिरकाव केला आहे. पालपेणे गावातही रस्त्यालगतच्या वाड्या कोरोनाने प्रभावित आहेत.
तालुक्यातील वेळंब व पवारसाखरी (प्रत्येकी 29 रुग्ण ), श्रृंगारतळी (28), तवसाळ, जामसुद, आरेगाव या तीन गावात प्रत्येकी (23), गिमवी (19), अडुर (18), पालशेत, आबलोली व अंजनवेल प्रत्येकी (17), चिखली व आरजीपीपीएल प्रत्येकी (14), त्रिशुळ साखरी (13), काजुली (12), हेदवी व पिंपर (10), शीर, नरवण, झोंबडी व कुटगिरी या 4 गावात प्रत्येकी (9), सुरळ व तळवली मध्ये प्रत्येकी (8), गोणवली (7), शिवणे व पाभरेमध्ये प्रत्येकी (6), सडेजांभारी, मळण, पोमेंडी, पाटपन्हाळे, पडवे, खामशेत व उमराठ या 7 गावांमध्ये प्रत्येकी (5) कोरोनाग्रस्त आहेत. जानवळे, निगुंडळ व विसापूर मध्ये प्रत्येकी (4), पाली, पालकोट व धोपावेमध्ये प्रत्येकी (3), वेळणेश्र्वर, कौंढर काळसुर, मासु, पाचेरीसडा, पांगारी, कुडली व कर्दे या गावांमध्ये प्रत्येकी (2) कोरोनाग्रस्त आहेत. तर असगोली, असोरे, कारुळ, कोंडकारुळ, कोळवली, खोडदे, जांभारी, तिसंग, परचुरी, पिंपळवट, मढाळ, रानवी, वाकी, वाघांबे, वाडदई व वेळंब तर्फे पांगारी या 17 गावात प्रत्येकी केवळ (1) रुग्ण आहे.
ग्राम कृती दले सक्रीय झाल्यास….
मे महिन्यात प्रत्येक गावात पाहुणे मंडळी येण्यास सुरवात होते. यावर्षी देखील गावागावातून अशी संख्या येण्यास सुरवात झाली आहे. गेल्यावर्षी तालुक्यातील ग्राम कृती दलांनी विलगीकरणाची प्रक्रिया उत्तमरित्या सांभाळली होती. त्यामुळे अनेक गावे कोरोना अस्पर्शित होती. आताही ग्राम कृती दले सक्रीय झाली तर विलगीकरणाचा विषय गाव हाताळु शकेल. त्यातून कोरोनाचा संसर्ग मर्यादित रहाण्यास मदत होईल.
5 किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण असलेल्या गावात माझी रत्नागिरी माझी जबाबदारी हे अभियान ग्रामस्थांनीच पुढाकाराने राबविले तर कोरोना सदृष्य स्थितीतील रुग्ण सापडण्यास मदत होईल. त्याला वेळीच गृह विलगीकरणात किंवा गावात स्वतंत्र ठेवले तर ते कुटुंबही कोरोनापासून वाचेल. या प्रक्रियेला शासन नक्कीच मदत करेल. त्यामुळे सर्वच गावांनी ग्राम कृती दले सक्रीय करावीत. असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
आम्ही प्रसिध्द केलेल्या एप्रिल महिन्यातील कोरोनाविषयक बातम्या
गुहागर तालुक्यात कोरोना पसरतोय (9 एप्रिल 2021)