गुहागर, ता. 12 : अवघ्या आठवडाभरात गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. 4 मे रोजी गुहागर न्यूजने प्रसिध्द केलेल्या ‘कोरोनाच्या विळख्यात लहान मुले’ या बातमीमध्ये गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 68 गावात 778 अशी होती. आज 11 मे च्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ही संख्या 53 गावात 326 अशी आहे.
लॉकडाऊनमधील नियंत्रण (Lockdown), लसीकरण (Vaccination), माझी रत्नागिरी अभियान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भितीपोटी घेतली जाणारी काळजी या सर्वाचा एकत्रित परिणाम तालुक्यात दिसत आहे. मात्र याच आठवड्यात 10 कोरोनामृत्यूंची (Death) नोंदही झाली आहे. In just one week, the number of corona victims in Guhagar taluka has halved. The number is 326 in 53 villages, according to the May 11 Health Department report today.
गुहागर नगरपंचायतीमधील साथ आटोक्यात (Corona pandemic in Control)
4 मे रोजी गुहागर नगरपंचायतीमध्ये सक्रीय रुग्णसंख्या 126 होती. आठवडाभरात 81 ने रुग्णसंख्या कमी झाली. 11 मे रोजीच्या अहवालाप्रमाणे शहरात सक्रीय रुग्णांची संख्या 45 आहे. शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. चिंद्रावळेत आरोग्य विभागाला यश ( Sucess to Hedavi Primary Health Centre)
हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतलेले कष्ट आणि त्याला साह्यभूत झालेले ग्रामस्थ यामुळे चिंद्रावळे गावातील कोरोनाचे प्रमाण आठवडाभरात 69 रुग्णांवरुन अवघ्या 5 रुग्णांवर आले आहे. ही बाब चिंद्रावळे ग्रामस्थांसाठी आणि हेदवी आरोग्य केंद्रासाठी आनंदाची, समाधानाची आहे.आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयत्न यशस्वी (The efforts of Abloli Primary Health Center were successful)कोतळूकमध्येही एका वाडीनंतर दुसरी वाडी असा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत होता. मात्र सलग दुसऱ्यांदा आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणेला कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळवता आले आहे. आठवडाभरापूर्वी कोतळूकमध्ये सक्रीय रुग्णसंख्या 50 होती. आज ही संख्या केवळ 12 आहे. जामसुतमध्येही 23 रुग्णसंख्येवरुन केवळ 1 रुग्ण अशी स्थिती आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. वेळंबमध्ये परिस्थिती जैसे थे (The situation not changes in Velamb) आठवडाभरापूर्वी वेळंब गावात 29 रुग्णसंख्या होती. आज 23 रुग्णसंख्या आहे. 8 व 9 मे या दोन दिवसांचा अपवाद सोडल्यास गेल्या 11 दिवसांत दररोज 2-5 रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या अभियानानंतर येथील परिस्थिती आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे. तवसाळचा अपवाद तालुक्यातील अन्य गावांचा विचार केला तर आठवडाभरात प्रत्येक गावातील कोरोनासंख्येत घट झाल्याचे पहायला मिळते. मात्र तालुक्यातील तवसाळ या गावात रुग्णसंख्या तब्बल 13 ने वाढली आहे. कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राने या गोष्टीची दखल घेत तवसाळमध्ये आरोग्य तपासणी शिबिरही भरवले होते. मात्र त्याचा परिणाम येण्यास अजुन काही काळ वाट पहावी लागेल.
कोणत्या गावात किती कोरोना रुग्ण
उमराठ, कुटगिरी, खामशेत, गोणवली, चिखली, जामसुत, तिसंग, पाटपन्हाळे, बोऱ्या कारुळ, भातगांव, वाडदई, साखरी आगर, खोडदे या 13 गावांत प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण आहे. अडूर, असगोली, आरेगांव, काताळे, कोंडकारुळ, देवघर, पांगारी, पोमेंडी, वडद, वेळणेश्र्वर, सुरळ या 11 गावांत प्रत्येकी 2 रुग्ण आहेत. पिंपर, सडेजांभारी आणि हेदवी या 3 गावांत प्रत्येकी 3 रुग्ण आहेत. जानवळे, मळण, तळवली, वेळंब पांगारी व शीर या 5 गावांत प्रत्येकी 4 रुग्ण आहेत. आबलोली, गिमवी, चिंद्रावळे, पडवे आणि पेवे या 5 गावांत प्रत्येकी 5 रुग्ण आहेत. वरवेली आणि वेलदूर या 2 गावांत प्रत्येकी 6 रुग्ण आहेत. कुडली आणि त्रिशुळ साखरी या 2 गावांत प्रत्येकी 7 रुग्ण आहेत. नरवणमध्ये (8), आरजीपीपीएल परिसरातील तीनही प्रकल्पात (कोकण एलएनजी, एल ॲण्ड टी व आरजीपीपीएल) मिळून (9), पवारसाखरी (9), पालशेत (9), कोतळूक (12), शृंगारतळी (16), अंजनवेल (17), वेळंब (23), पालपेणे (26), तवसाळ (36), गुहागर (45) अशी रुग्ण संख्या आहे.
1 एप्रिल ते 11 मे पर्यंतचा एकत्रित अहवाल (कंसातील आकडा संपूर्ण कोरोना महामारीचा)
एकूण कोरोनाबाधित : 1826 (2656)
बरे झालेले रुग्ण : 1456 (2269)
कोरोना मृत्यू : 44 (61)
उपचार घेत असलेले एकूण रुग्ण : 326
डेरवण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले : 10
लाईफ केअर, चिपळूण : 2
रेनबो, शृंगारतळी : 20
डॉ. पुजारी : 1
वेळणेश्र्वर कोविड केअर सेंटर : 21
ग्रामीण रुग्णालय, गुहागर : 20
मुंबई : 2
कामथे उपजिल्हा रुग्णालय : 4
रत्नागिरी (शासकीय व खासगी) : 5
स्वगृही विलगीकरणात : 241
1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.