उज्वला पवार यांच्यावर दोषारोप पत्र दाखल
गुहागर, ता. 06 : 2015-16 या कार्याकाळात प्रकल्प अधिकाऱ्यांचा पदभार सांभाळताना उज्वला पवार यांनी गैरव्यवहार केला आहे. पोषण आहार व औषध पुरवठा न करता परस्पर देयके देणे व कुपोषित बालकांना लाभापासून वंचित ठेवणे. असे दोषारोप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आणि महिला व बालविकास प्रकल्पाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी यांनी ठेवले आहेत.
गुहागर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेने 2016 मध्ये जिल्हा परिषद महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. त्यामध्ये प्रकल्प अधिकारी उज्वला पवार (Project Officers Ujvala Pawar) यांनी पोषण आहार मिळाल्याबद्दल 65 अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या खोट्या सह्या (False signatures) घेतल्याचे तसेच शृंगारतळीतील काही व्यापारी व औषध विक्रेते यांची खोटी बीले (False Bills) जोडल्याचे नमुद केले होते. याबाबत जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरु होती. ही चौकशी पूर्ण झाल्यावर 19 जुलै 2021 रोजी उज्वला पवार यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले. यामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार व औषध पुरवठा न करता परस्पर देयके अदायगी करणे आणि बाल विकास केंद्रांमधील 0 ते 6 वर्ष वयोगटातील 27 अति तिव्र कुपोषित व 67 मध्यम तिव्र कपोषित बालकांना पोषण आहार व औषध पुरवठा न करता सदर बालकांना लाभापासून वंचित ठेवणे असे दोन आरोप निश्चित करण्यात आले आहे.
या संदर्भात 5 ऑगस्ट 2021 ला जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण अधिकारी योगेश जवादे, सहाय्यक प्रशासन अधिकारी आकांक्षा मोरे, विस्तार अधिकारी दिपाली पवार व वरिष्ठ सहाय्यक महेश वरक यांनी गुहागरच्या महिला बाल कल्याण कार्यालयात येवून चौकशी केली. यावेळी उज्वला पवार यांच्या कार्यकाळातील 5 वर्षांचे शासकीय दफ्तरही सापडत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत तिसरी सुनावणी 9 ऑगस्टला होणार आहे. त्यावेळी सापडत नसलेले दफ्तर हजर करण्याचे आणि आरोपांबाबत म्हणणे मांडण्यास उज्वला पवार यांना सांगण्यात आले आहे. अशी माहिती जवादे यांनी दिली आहे.
Mutual payment without supplying nutritious food and medicine and depriving malnourished children of benefits. Such allegations were made by the Chief Executive Officer of Zilla Parishad, Dr. Indurani Jakhar and District Executive Officer of Women and Child Development Project.