• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात अवघ्या 6 दिवसांत 86 बाधित

by Mayuresh Patnakar
April 16, 2021
in Old News
16 0
2
गुहागर तालुक्यात अवघ्या 6 दिवसांत 86 बाधित

Filed Image

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सर्वाधिक रुग्ण गुहागर नगरपंचायत क्षेत्रात, प्रशासन चिंतेत

गुहागर, ता. 15 : आज तालुक्यातील 41 गावात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 223 आहे. अवघ्या 6 दिवसांत कोरोगा रुग्णांमध्ये 86 ने तर गावांमध्ये 10 ने वाढ झाली आहे. तर दुसऱ्या लाटेत म्हणजे मार्च 2021 पासून दिड महिन्यात 7 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्यातील प्रशासन चिंतेतआहे. तर तालुक्यातील काही कोरोनाग्रस्त आजही निष्काळजीपणे फिरत असल्याचे चित्र आहे. ही गुहागर तालुकावासीयांसाठी धोक्याची घंटा आहे. In Guhagar Taluka 223 Corona Patient in 41 villages today. From 9th April to 15th April 86 Corona Patient increases. In Second Wave 7 death due to Corona.

९ एप्रिल रोजी तालुक्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा ‘गुहागरात कोरोना पसरतोय’ या बातमीतून घेतला होता. त्यावेळी तालुक्यातील 31 गावांमध्ये 137 रुग्णांची नोंद आहे.  कोतळूक, मढाळ, रानवी ग्रामपंचायत व गुहागर नगरपंचायत क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या १० पेक्षा अधिक होती. आज 15 एप्रिल रोजी गुहागर तालुक्यातील 42 गावांमध्ये 223 रुग्णांची नोंद आहे. 10 पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या 4 गावांवरुन 6 गावांवर पोचली आहे.

कोणत्या गावात किती रुग्ण ?
Corona Status In Guhagar Taluka
गुहागर 30, शृंगारतळी 18, आबलोली 20, वेळंब 17, रानवी 14, मढाळ 10,  पवारसाखरी 9, आरे 9, कोतळूक 9, पाटपन्हाळे 7,  तळवली 7, जानवळे 6, भातगांव 6, कारुळ 6, वेलदूर 5, सीआयएसएफ 4, खोडदे 4, पाचेरीआगर 4, पालपेणे 3, वरवेली 2, अडूर 2, अंजनवेल एलएनजी 2, शिवने 2, पाचेरी सडा 2, कुडली 2, तळवली 2, शीर 2, कौंढर काळसुर 2, विसापूर 2, मुंढर 2, निगुंडळ 2, वाघांबे -1, कारुळ 1, कुटगिरी 1, खामशेत 1, चिखली 1, तवसाळ 1, सडेजांभारी 1, पिंपर – 1, सुरळ 1,  आरजीपीपीएल कॉलनी 1, पोमेंडी 1.
गुहागर तालुक्यातील 1 रुग्ण डेरवण येथे, 2 रुग्ण खासगी कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 4 असून कामथे उपजिल्हा रुग्णालयात 7 रुग्ण उपचार घेत आहेत. 209 कोरोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

अवघ्या दिड महिन्यात ७ जणांचा मृत्यू
पहिल्या लाटेत गुहागर तालुक्यातील 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेत म्हणजेच मार्च 2021 पासून आजपर्यंत आणखी 7 रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 20 वर पोचली आहे.  मार्च 2020 पासून सुरु झालेल्या कोविड महामारीतील बाधितांची एकूण संख्या 1133 असून त्यापैकी 890 रुग्ण आजपर्यंत बरे झालेत.

एकूणच गुहागर तालुक्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. तरीही गृह विलगीकरणातील काही कोरोनाग्रस्त आम्हाला कोरोना झालेलाच नाही. आमच्या टेस्ट खोट्या आहेत. असे आरोप करुन, विलगीकरणाचे नियम मोडून सर्वत्र संचार करताना दिसतात. अशा रुग्णांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.  

प्रशासन गतिमान
तालुका प्रशासनाने वेळणेश्र्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालय पुन्हा एकदा कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेतले आहे. तर गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याशिवाय गुहागर तालुक्यात खासगी कोविड हॉस्पिटल सुरु होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

Tags: Breaking NewsCoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLockdownMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiकोरोनाकोरोना बातम्यागुहागरातील कोरोनाटाळेबंदीटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलॉकडाऊनलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.