• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी-वेळंब रोडवर भरलेले खड्डे उकरले

by Mayuresh Patnakar
September 3, 2026
in Guhagar
154 2
1
Contractor's substandard construction
303
SHARES
865
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ठेकेदाराच्या निकृष्ट बांधकामाचा नमुना

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी-वेळंब मार्गावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. मात्र, पावसाच्या सरींनी या भरलेल्या खड्ड्यांतील खडी, वाळूचा माल वाहून जात आहे. त्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठेकेदारांची कामे अशीच चालतात का असा सवाल वाहनचालक, प्रवाशांनी उपस्थित केला आहे. Contractor’s substandard construction

शृंगारतळी- वेळंब मार्गावर सध्या खड्डे बुजविले जात आहेत. यासाठी खडी, वाळू, सिमेंट यांचे मिश्रण करुन ते खड्ड्यांमध्ये टाकले जात आहे. मात्र, पावसाच्या पाण्याने त्यातील माल वाहून जात असल्याने पुन्हा खड्डे दिसून येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची अशी रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार अशी निकृष्ट कामे करुन शासनाचा वा जनतेचा पैसा खड्ड्यात टाकत असल्याचा आरोप होत आहे.  Contractor’s substandard construction

शृंगारतळी – वेळंब- आबलोली हा प्रमुख मार्ग आहे. रत्नागिरीकडे जाणारा हा मार्ग पर्यटनदृष्ट्या महत्वाचा आहे. त्यामुळे सातत्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. अशा रस्त्यावर या पध्दतीने खड्डे भरले जात असतील तर ग्रामीण भागातील रस्त्यांची काय स्थिती असेल, असा सवाल उपस्थित होत आहे. Contractor’s substandard construction

Tags: Contractor's substandard constructionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share121SendTweet76
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.