कोकण प्रवासी ग्रामीण महासंघाचे कार्याअध्यक्ष अनिलकुमार जोशी यांची मागणी
गुहागर, ता. 25 : गुहागर आगारातून लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद करू नयेत असे कोकण प्रवासी ग्रामीण महासंघ कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार अनिलकुमार जोशी यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांना भ्रमणध्वनी व्दारे रजिस्टर ए डी ने निवेदने दिली. Continue long-distance trains from Guhagar depot

गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर अक्कलकोट, तुळजापूर, पिंपरी चिंचवड, स्वारगेट, भांडुप, ठाणे, नालासोपारा, विठ्ठलवाडी, मुंबई सेंट्रल, परळ, बोरीवली या लांब पल्लाच्या गाड्या प्रवाशांच्या सोयीच्या आहेत. या प्रवासी गाड्या पावसाळ्यात कायम ठेवाव्यात. गुहागर पिंपरी चिंचवड एस.टी. बस फेरा रात्री चालू करावा. कारण या गाडीने, भोसरी, पिंपरी, चिंचवड, वाकडेवाडी बस डेपो, मराठवाड्यात, खानदेशात जाणाऱ्या प्रवाशांना गुहागर पिंपरी चिंचवड बस अत्यावश्यक असून प्रवासी भाडेही चांगले मिळते. गुहागर अक्कलकोट संध्याकाळची एस.टी.बस कायम ठेवावी. तसेच गुहागर डेपोची अनेक वर्षे चालू असलेली गुहागर कोल्हापूर गाडीची आवश्यकता आहे. महाव्यवस्थापकांनी वाहतूक नियंत्रक अधिकारी रत्नागिरी डेपो मॅनेजर गुहागर यांनी गुढे फाटा, चिवेली फाटा प्रवासी थांबे मंजूर करून प्रवाशांना न्याय द्यावा. अशी मागणी अनिल कुमार जोशी यांनी केली आहे. प्रवासांनी संपर्क साधला तर त्यांना सहकार्य करावे. Continue long-distance trains from Guhagar depot