• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 April 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निरामय संदर्भातील अहवाल न्यायालयाला दिला का ?

by Guhagar News
April 14, 2026
in Guhagar
58 1
0
114
SHARES
325
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

यशवंत बाईत, न्यायालयाने निवडलेल्या कमिटीची बैठक बोलावा

गुहागर, ता. 14 : न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे बैठक घेऊन निरायम बाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात पाठवावा. 21 दिवसात बैठक घेऊन निरामय रुग्णालय सुरू करण्याबद्दल निर्णय न घेतल्यास आम्ही मा. मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचीका करू. असे निवेदन यशवंत बाईत यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कोकण एल.एन.जी.ली. दिले आहे. या पत्रामध्ये यशवंत बाईत यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयातील रीट पेटीशन नं. 2735/94 मधील आदेशाचा संदर्भ जोडल्याने निरामयच्या विषयाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. Contempt Petition regarding Niramay Hospital

याबाबत बोलताना अंजनवेलचे माजी सरपंच यशवतं बाईत म्हणाले की, अंजनवेल- वेलदूर-रानवी पंचक्रोशीतील निरामय रुग्णालय सुमारे 25 वर्ष बंद आहे. निरामय रुग्णालय सुरु करण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले परंतू शासनाकडून त्यासाठी केव्हाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आरोग्य खात्यासह उद्योग आदी संबंधित खात्यांचे अधिकारी व मंत्री यांनी देखील हा विषय कधीही गांभिर्याने घेतलेलाच नाही. आजपर्यंत नेत्यांनी कंपनीच्या आवारात आल्यानंतर केवळ घोषणा केल्या. लोकांच्या तीव्र भावना कॅश करण्याचा प्रयत्न केला. मात्र निरामय रुग्णालय सुरू करण्यामागे मा. मुंबई उच्च न्यायालयातील रीट पेटीशन नं. 2735/94 मधील आदेशाचा संदर्भ आहे. हेच अधिकारी, लोकप्रतिनिधी विसरले आहेत. Contempt Petition regarding Niramay Hospital

1994 मध्ये दाभोळ वीज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत अंजनवेल- वेलदूर-रानवी येथील सुमारे 610 हेक्टर जमीन संपादीत केली.  या भूसंपादनाविरोधात कातळवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने 4 शेतकऱ्यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयात रीट पेटीशन (नं. 2735/94) केले होते. रीट पेटीशनचा निकाल 27 जुलै 1994 रोजी आला. मा. मुंबई उच्च न्यायालयाने या निकालात येथील प्रकल्पग्रस्थ शेतकरी व ग्रामस्थांसाठी पुनर्वसन योजना जाहीर केली आहे. पुनर्वसन योजनेतील विषयांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी व अंमलबजावणीच्या पूर्तता करून घेण्यासाठी मा. मुंबई उच्च न्यायालयाने मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. पुनर्वसन योजनेच्या पूर्ततेबद्दल मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी प्रतिवर्षी मा. मुंबई उच्च न्यायालयाला अहवाल द्यायचा आहे. मात्र माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी निरामय रुग्णालय बंद असल्याचा (प्रतिवर्षी पाठवायचा अहवाल) अहवाल मा. मुंबई उच्च न्यायालयाला पाठवलेलाच नाही. Contempt Petition regarding Niramay Hospital

जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या कित्येक वर्षात या बैठका घेतल्या नाहीत. त्यामुळेच निरामयसह अन्य विषय क्लिस्ट बनत गेले आहेत. याच मुद्द्याला धरुन यशवंत बाईत यांनी 27 मार्च 2026 रोजी मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पत्र मिळाल्यापासून 21 दिवसांत बैठक घेवून निरामय रुग्णालयाबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मा. उच्च न्यायालयाला पाठवावा. तसा अहवाल न पाठविल्यास आम्ही मा. मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचीका करू, असे यशवंत बाईत यांनी नमुद केले आहे. याच पत्राची कॉपी आरजीपीपीएलचे. मुख्य कार्यकारी तसेच कोकण एल.एन.जी.लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पाठविण्यात आले आहे. Contempt Petition regarding Niramay Hospital

Tags: Contempt Petition regarding Niramay HospitalGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.