• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 November 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उद्या रानवी येथे संविधान दिनाचे आयोजन

by Mayuresh Patnakar
November 25, 2026
in Guhagar
32 0
0
Constitution Day celebration at Ranavi
63
SHARES
180
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बौद्धजन सहकारी संघ, रानवी शाखेचा स्तुत्य उपक्रम

गुहागर, ता. 25 : बौद्धजन सहकारी संघ रानवी शाखा क्र. 05, बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर विभाग नं.-1 महिला मंडळ व बौद्धजन सहकारी संघ रानवी शाखा क्र.- 05 गाव व मुंबई या धम्म संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी रानवी बौद्धवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. Constitution Day celebration at Ranavi

यावेळी सकाळी 10:00 वाजता आयटीआय रानवी येथे संविधान मंदिर दर्शन सोहळा त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी 11:15 वाजता संविधान ग्रंथाचे पूजन, त्यानंतर पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न होईल. दुपारी 12:00 वाजता रानवी शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि सभासद महिला – पुरुषांचा  सत्कार, सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख वक्ते आयु. संजय गमरे यांचे संविधान दिनावर मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी 01:30 वाजता उपस्थित सर्वांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. Constitution Day celebration at Ranavi

तरी या संपूर्ण कार्यक्रमाला रानवी पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ रानवी शाखा क्र. 05 या धम्म संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. Constitution Day celebration at Ranavi

Tags: Constitution Day celebration at RanaviGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share25SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.