शेकडो भाविकांनी केली नवसाची परत फेड
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवीच्या सहाणेवर श्री हसलाई देवीचा वार्षिक गोंधळ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गोंधळाची धार्मिक परंपरा आजपर्यंत मोठ्या श्रद्धेने वरवेली गावाने जपली आहे . या गोंधळ कार्यक्रमात शेकडो भाविकांनी देवीला केलेल्या नवसाची परत फेड केली. नागरिकांनी हाती दिवट्या घेऊन नाचण्याचा आनंद घेतला. Confusion of Goddess in Varveli


या गोंधळामध्ये देवीच्या सहाणेवर चौकोनी रांगोळी काढून चौक भरण करून चार बोरूच्या काठ्या उभ्या करून त्याला हार फुलांनी सजविण्यात आले होते. चौक भरणाच्या बाजूला दोन दिवट्या गेल्या व चालू वर्षाच्या पेटविण्यात आल्या. देवीचे गावकर वसंत शिंदे व शिंदे मंडळी, देवीचे पुजारी सदानंद गुरव यांनी पूजा केल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. उपासकऱ्यानी पूजन केल्यानंतर दिवटी नाचविण्यात आली. सर्व देव देवतांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. Confusion of Goddess in Varveli


या गोंधळ कार्यक्रमात शेकडो भाविकांनी देवीला केलेल्या नवसाची परत फेड केली. गोंधळाची धार्मिक परंपरा आजपर्यंत मोठ्या श्रद्धेने वरवेली गावाने जपली गेली आहे. या गोंधळ कार्यक्रमात गावातील नागरिकांनी हाती दिवट्या घेऊन नाचण्याचा आनंद घेतला. देवीचे पहिले मानकरी राजेश शांताराम विचारे यांनी गोंधळ कार्यक्रमाला उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घेतला. यावेळी गाव तसेच मुंबईकर बहुसंख्येने उपस्थित होते. Confusion of Goddess in Varveli