७ व्यापाऱ्यांचे शासकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह पण खासगी रिपोर्ट निगेटिव्ह
तालुकाप्रमुख सचिन बाईत : व्यापारी कोरानामुक्त की कोरोनाग्रस्त हे कोण सांगणार
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठतील व्यापाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली. या चाचणीमध्ये 16 दुकानदारांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तातडीने बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला. त्यापैकी 7 व्यापाऱ्यांनी खात्रीसाठी डेरवण येथे पुन्हा चाचणी केली. त्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. या घटनेमुळे नक्की कोणाचे अहवाल ग्राह्य मानावेत असा प्रश्र्न व्यापाऱ्यांना पडला आहे. सद्यस्थितीत आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे गृहित धरुन हे व्यापारी स्वगृही विलगीकरणात आहेत.
For Precaution Abloli Vyapari Sanghatana took a desion of RTPCR Test. In this Test 16 traders came Corona Positive. But between those 7 traders again took corona test (Antigen and RTPCR) at Dervan Hospital. In both test all those 7 traders tests are Negative. Due to this different Reports, the traders are wondering whose report should be accepted.
आबलोली ही तालुक्यातील 25 गावांसाठी मध्यवर्ती असलेली बाजारपेठ आहे. येथून सावर्डे, डेरवण, रत्नागिरी, जयगड जवळ असल्याने खासगी वहातूकीचेही आबलोली मोठे केंद्र आहे. आजुबाजुच्या ग्रामीण भागांमधील ग्रामस्थ बँकिंग, व्यापार, शिक्षण, आरोग्य आदी सेवांसाठी आबलोलीवर अवलंबून असतात. त्यामुळे ही बाजारपेठ कायम गजबजलेली असते. आजुबाजुच्या परिसरातील गावांतून कोरोनाचा प्रसार होवू लागल्याने येथील व्यापारी संघटनेने सर्व व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे 9 व 10 एप्रिलला 25 व्यापाऱ्यांनी आबलोली प्राथमिक केंद्रात आरटीपीसीआरसाठी स्वॅब दिला. त्या अहवालात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 11 एप्रिल व 12 एप्रिलला विकेंड लॉकडाऊन शासनाने जाहीर केला होता. सोमवारी आबलोलीची बाजारपेठ बंदच असते. मंगळवारी (13 एप्रिल) 16 व्यापारी कोरोनाग्रस्त समजल्यावर व्यापारी संघटनेने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून दुपारपर्यंत फक्त औषधांची दुकाने उघडी ठेवली. मंगळवारी सायंकाळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचे कोणतेही निर्देश नसताना लोकहितासाठी 20 एप्रिलपर्यंत खासगी वहातुकीसह सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले.
दरम्यान 16 कोरोनाग्रस्त व्यापाऱ्यांना कोणतीच लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यातील 7 व्यापाऱ्यांनी 14 एप्रिलला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जावून पुन्हा ॲन्टीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. या तपासण्या सशुल्क असल्याने दोन्ही तपासण्यासाठी प्रत्येकी 800 रुपये खर्च आला. 16 एप्रिलला डेरवण रुग्णालयातील तपासण्याच्या अहवालात सातही व्यापारी कोरोनाग्रस्त नसल्याचे स्पष्ट झाले.
शासनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि खासगी रुग्णालयाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आबलोलीतील व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. या सात व्यापाऱ्यांनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून वैद्यकिय अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र आरटीपीसीआर तपासणीचे अहवाल रत्नागिरी बनत असल्याने याची कारणे देण्यास वैद्यकिय अधिकारी गावड यांनी असमर्थता दर्शवली.
जिल्हा प्रशासनाने चाचणी अहवालातील त्रुटी शोधाव्यात : तालुकाप्रमुख सचिन बाईत
आबलोलीत चाचण्यांवरुन संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सदरचे व्यापारी कोरोनाग्रस्त की कोरोनामुक्त हे कोण सांगणार असा प्रश्र्न आमच्यासमोर आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने चाचणी अहवालातील त्रुटी शोधणे आवश्यक आहे. त्यासाठी आबलोली व्यापारी संघटनेतर्फे आम्ही आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदींना निवेदन देणार आहोत. अशी माहिती शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी दिली. (Shivsena Taluka Pramukh Sachin Bait Said – Confusion has arisen from the tests in Abloli. We are Confused. Which Authority will say that this traders are coronated or corona free. Also the District Government needs to find the errors in the test report.
आबलोलीतील चाचणी अहवाला संदर्भात व्यापारी संघटनेचे सल्लागार, शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, स्थानिक आरोग्य अधिकारी, कर्मचारी गेले वर्षभर कोरोनाचा लढा लढत आहेत. शिवाय आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल रत्नागिरीत बनतो. त्यामुळे या व्यापाऱ्यांची स्थानिक आरोग्य यंत्रणेवर नाराजी नाही. मात्र एकाच व्यक्तीचे परस्पर विरोधी अहवाल येण्याने संभ्रम आहे. आज त्या व्यापाऱ्यांनी कोरोनाग्रस्त म्हणून स्वगृही विलगीकरणा रहावे की कोरोना नाही म्हणून नित्याचे व्यवहार आचरावेत. असा प्रश्र्न आहे. या सातजणांखेरीज 9 व्यापाऱ्यांनाही कोणतीही लक्षणे नाहीत. सात जणांना 800 रुपये खर्च करणे परवडले. प्रत्येकाला अशा दोनवेळा तपासण्या करणे परवडणारे नाही. सोयीचेही नाही. त्यामुळे शासनाच्या व्यवस्थेत दोष असेल तर तो शोधण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. अशी आमची मागणी आहे. त्यासंबंधीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. आमदार यांना देणार आहोत.
शिवाय मंगळवार 20 एप्रिल पासून अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु करावी लागणार आहेत. कारण शनिवार 9 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. आता दुकाने बंद राहीली तर जीवनावश्यक वस्तुंबाबत ग्रामस्थांची गैरसोय होईल. मग ही दुकाने सुरु करताना या व्यापाऱ्यांचा कोणता रिपोर्ट ग्राह्य धरायचा हा देखील प्रश्र्न आहे. या व्यापाऱ्यांनी शासनाकडे पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करुन घेण्याची मागणी केली आहे. मात्र एकाच व्यक्तिची दोन वेळा तपासणी करता येत नाही. अशा आरोग्य विभागाचा निर्णय आहे. मग हा गुंता कसा सोडवायचा. अशा कात्रीत आबलोलीतील व्यापारी सापडले आहेत.