• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 November 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

 पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला संगणक संच भेट

by Mayuresh Patnakar
November 4, 2026
in Guhagar
25 0
0
Computer set gifted to Patpanhale College
49
SHARES
139
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 कोकणपुत्र, स्कॉनचे सर्वेसर्वा श्री निलेश चव्हाण यांचा स्तुत्य पुढाकार

गुहागर, ता. 04 : ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, डिजिटल शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक सुविधांची दरी कमी व्हावी, या उद्देशाने पाटपन्हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला तीन लाख रुपये किमतीचे पाच संगणक संच भेट देण्यात आले. स्कॉन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व कोकणचे सुपुत्र मा. श्री. निलेश शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो आणि स्कॉन प्रो फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. Computer set gifted to Patpanhale College

या प्रत्यक्ष स्वरूप देण्यात स्कॉन उद्योग समूहाचे संचालक व रामपूरचे सुपुत्र श्री. शैलेश दत्तात्रय मोरे यांचा पुढाकार आणि नेतृत्व विशेष महत्त्वाचे ठरले. शाळेच्या श्री शिवछत्रपती सभागृहात आयोजित कार्यक्रमाला स्कॉन उद्योग समूहाचे ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक श्री. सतीश शंकरराव चव्हाण, समूहाचे वरिष्ठ अधिकारी श्री. समाधान सोनवणे व श्री. दिनेश महादलेकर आणि प्रथितयश व्यावसायिक श्री. राजेश थरवळ यांची विशेष उपस्थिती होती. Computer set gifted to Patpanhale College

यावेळी श्री. सतीश चव्हाण यांनी मनोगतातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. समाधान सोनवणे यांनी संगणक संच भेट देण्यामागील स्कॉन उद्योग समूहाची भावना आणि सामाजिक बांधिलकी विशद केली. तसेच रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो आणि स्कॉन प्रो फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व सामाजिक विकासाच्या क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. Computer set gifted to Patpanhale College

स्कॉन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. निलेश चव्हाण यांची आपल्या जन्मभूमीचे ऋण समाजोपयोगी कार्यातून फेडण्याची दूरदृष्टी या उपक्रमांमागील प्रमुख प्रेरणा आहे. आपण ज्या मातीत जन्मलो आणि ज्या परिसरात लहानाचे मोठे झालो, त्या भागातील पुढील पिढीला प्रगतीच्या समान संधी मिळाव्यात तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ही त्यांची सातत्यपूर्ण भूमिका आहे. याच विचारातून स्कॉन उद्योग समूह आणि त्याच्या सामाजिक उपक्रमांचे कार्य सुरू आहे. Computer set gifted to Patpanhale College

स्कॉन उद्योग समूहाच्या सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो आणि स्कॉन प्रो फाऊंडेशन यांच्या माध्यमातून यापूर्वीही कोकणात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. रामपूर येथे आयोजित मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा ७० हून अधिक रुग्णांना लाभ झाला. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून कोकणातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात-पाय वितरण शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमांतर्गत ५० हजार रुपयांहून अधिक किमतीचे कृत्रिम पाय गरजू लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले जात आहे. Computer set gifted to Patpanhale College

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे ही गुहागर तालुक्यातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. या संस्थेत एकूण १,०३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये शाळेने १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत शाळेने गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. Computer set gifted to Patpanhale College

कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संपदाताई सुधाकर चव्हाण, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सुधाकर पांडुरंग चव्हाण, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुमंत भिडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संजीव सिताराम मोरे (पर्यवेक्षक) यांनी केले. या उपक्रमासाठी श्री. शैलेश मोरे यांनी घेतलेला विशेष पुढाकारही ग्रामीण विकासाप्रती त्यांच्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरतो. Computer set gifted to Patpanhale College

Tags: Computer set gifted to Patpanhale CollegeGuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.