कौशल्य विकास योजनेअंतर्गत आयोजन
गुहागर, ता. 27 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाणे व जीवन शिक्षण संस्थांन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर येथे शासनाच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत इलेक्ट्रिकल कोर्स सुरु करण्यात आला होता. सदर कोर्समध्ये 20 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचे काम श्री. सचिन विचारे यांनी केले. गेस्ट लेक्चरर म्हणून श्री. सुरेंद्र वैद्य (गोदरेज एरोस्पेस चे निवृत्त CEO )यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. Completed Electrical Course at Mundhar


ग्रामीण भागातील विद्यार्थाना विविध कौशल्य विकास योजनेचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी श्री. वैद्य सर यांनी स्वतः वर्कशॉप तयार केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिशन, सुतारकाम, फिटर प्लम्बिंग, वेल्डिंग, स्प्रे -पेंटिंग यांचे अद्ययावत मॉडेल तयार करून प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिले आहेत. येथे प्रशिक्षण घेतल्यामुळे या प्रशिक्षणार्थिना आपल्या गावातच उत्पनाचे साधन मिळाले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यालयात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही सर्व कोर्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. Completed Electrical Course at Mundhar
हे प्रशिक्षण केंद्र चालण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष. श्री. विनयजी नातू साहेब, नातू परिवार व जनशिक्षण संस्थांनाच्या संचालिका सौ. सिमा यादव मॅडम, निधी मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनंत साठे सर व विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रशिक्षण केंद्रावर 1 डिसेंबर 2023 पासून प्लम्बिंग हा कोर्स सुरु करण्यात येत आहे. या प्लम्बिंग कोर्स प्रवेशासाठी श्री. साठे सर 8888265965, श्री. बडद 9689988809, श्री. विचार सर 9921995606 यांच्या नंबरवर संपर्क करावा. Completed Electrical Course at Mundhar