रत्नागिरी, ता.04 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांचे शिरगाव, रत्नागिरी येथे तिसरे नवीन नर्सिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सुरू होत आहे. यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२३ असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. College of Maharishi Karve Stree Education Institute at Ratnagiri


आधुनिक विचारांप्रमाणे परिचर्या सेवा फक्त रुग्णालयापुरत्या मर्यादित न राहता सर्व समाजापर्यंत पोहोचून आरोग्य विषयक माहिती पुरवण्याचे काम परिचर्या करतात. या हेतूनेच संस्थेची पुणे व नागपूर येथे २ नर्सिंग महाविद्यालये आहेत. यामधून ANM. GNM, BSC, PBBsc, MSC, Ph. D. नर्सिंग हे अभ्यासक्रम शिकवले जातात. या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी २८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. प्रवेशासाठी कॉलेज ऑफ शिरगाव, साखरतर रोड, रत्नागिरी. प्रवेशासाठी ७६६६५०४२४३ / ९४०३२१४११९ या नंबर वर संपर्क करावा. College of Maharishi Karve Stree Education Institute at Ratnagiri


रत्नागिरीत सुरू होणारे संस्थेचे तिसरे महाविद्यालय असणार आहे. यामध्ये ए. एन. एम. नर्सिंग हा दोन वर्षाचा शासनमान्य डिप्लोमा कोर्स सुरु करत आहोत. ह्या नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेची मान्यता प्राप्त आहे. नर्सिंग कॉलेजची स्वतंत्र इमारत व स्वतंत्र वसतिगृहाची सोय आहे. तसेच प्रशस्त वर्गखोल्या व अत्याधुनिक प्रात्यक्षिक वर्ग आहेत, जिथे विद्यार्थिनी नर्सिंग प्रात्यक्षिकांचा सराव करू शकतात. विद्यार्थिनींना वाहतूकीची सुविधा आहे. या नर्सिंग कॉलेजमध्ये 400 नर्सिंगच्या पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. या कोर्ससाठी विद्यार्थिनींना 10+2 कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कॉलेजमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक अनुभवासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी, चिंतामणी हॉस्पिटल रत्नागिरी, चिरायू हॉस्पिटल रत्नागिरी, तसेच शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात येणार आहे. यासाठी वाहतुकीची सोय कॉलेजने केली आहे. College of Maharishi Karve Stree Education Institute at Ratnagiri