• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार

by Guhagar News
January 16, 2025
in Maharashtra
135 1
0
College Marathi one act competition will be held
265
SHARES
756
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

या स्पर्धेतून नवे कलाकार उदयाला येतील; आशिष शेलार

मुंबई, ता. १६ :  विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार आहे.  या स्पर्धेत तालीम, प्राथमिक आणि अंतिम अशा तीन फेरी आहेत. या स्पर्धेतून नवे कलाकार उदयाला येतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला. College Marathi one act competition will be held

विजेत्या एकांकिकेला गुणानुक्रमे १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट बोलीभाषा एकांकिकेला ५० हजारांचे प्रथम बक्षीस आहे.  तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा, अभिनय अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. College Marathi one act competition will be held

स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३६ केंद्रांवर तालीम फेरी पार पडेल. तालीम फेरीत सादर होणाऱ्या एकांकिकेची प्राथमिक फेरीत निवड होईल. या निवड झालेल्या संघांना एकांकिकेच्या तयारीसाठी दहा हजार रुपये नाट्यनिर्मिती खर्च दिला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सहा महसुली विभागाच्या मुख्यालयात प्राथमिक फेरी होणार आहे, तर मुंबईत अंतिम फेरी रंगणार आहे. College Marathi one act competition will be held

Tags: College Marathi one act competition will be heldGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuccess of Guhagar High School StudentsUpdates of Guhagar
Share106SendTweet66
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.