• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण करा

by Guhagar News
February 14, 2022
in Guhagar
33 0
0
Chhatrapati Shivaji Maharaj Chowk

Chhatrapati Shivaji Maharaj Chowk

64
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शहर भाजपचे गुहागर नगरपंचायतीला निवेदन

गुहागर, ता.14 : शहरातील “शिवाजी चौक” या ठिकाणाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज चौक” करावे, या मागणीचे निवेदन गुहागर शहर भाजपच्यावतीने (BJP) गुहागर नगरपंचायतीला देण्यात आले. Chhatrapati Shivaji Maharaj Chowk

निवेदनात पुढे म्हटले आहे की, गुहागर शहरातील “शिवाजी चौक” या ठिकाणाचे नाव गेली अनेक वर्षे एकेरी भाषेत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक  छत्रपती शिवाजी महाराज हे थोर व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करताना तो आदरपुर्वकच करावा व तमाम जनतेने सुद्धा त्या ठिकाणाचे नाव आदरपूर्वक घेतले पाहिजे, यासाठी गुहागर शहरातील “शिवाजी चौक” या ठिकाणाचे नाव बदलून “छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे ठेवावे. येत्या शिवजयंतीला या नावाचे नामकरण झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कार्यास मानवंदना ठरेल. Chhatrapati Shivaji Maharaj Chowk

दर निवेदन देण्यासाठी भाजपाचे (BJP) शहर अध्यक्ष संगम मोरे, नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, भाजपा युवा मोर्चा गुहागर तालुकाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक संजय मालप, नगरसेवक समीर घाणेकर, मृणाल गोयथळे, भाग्यलक्ष्मी कानडे, युवामोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, हेमंत बारटक्के, महिला शहराध्यक्षा नेहा वराडकर, नरेंद्र वराडकर, प्रथमेश परांजपे आदी उपस्थित होते. Chhatrapati Shivaji Maharaj Chowk

Tags: BJPChhatrapati Shivaji Maharaj ChowkGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet16
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.