• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

असगोली शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे यांचा वाढदिवस

by Manoj Bavdhankar
July 11, 2026
in Guhagar
34 0
0
Chandrakant Zagade's birthday
66
SHARES
189
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्रा. मराठी शाळा असगोली क्र. १ चे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत झगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. Chandrakant Zagade’s birthday

कार्यक्रमास केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील, विषय शिक्षक श्री. शिवानंद साखरे, कोंड-कारूळ बोऱ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत वायंगणकर, तंत्रस्नेही शिक्षक श्री. प्रदीप पवार, सौ. अंजली मुद्दमवार, सौ. दीक्षा गुरव आदी उपस्थित होते. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शुभेच्छापत्र देऊन झगडे सरांना शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. Chandrakant Zagade’s birthday

Chandrakant Zagade's birthday

प्रदीप पवार यांनी सांगितले की, झगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली असगोली क्र. १ शाळेचा सर्वांगीण विकास होत असून शिक्षक संघटनेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. प्रशांत वायंगणकर यांनी झगडे सर यांचे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व, ग्राहक चळवळीत केलेले कार्य आणि व्यापक जनसंपर्क यांचा गौरव केला. केंद्रप्रमुख मनोज पाटील यांनी झगडे सर हे शिक्षण क्षेत्रातील प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व असल्याचे सांगितले. शिक्षक बँकेचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रात तसेच ग्राहक चळवळ आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी झगडे सर नेहमीच कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. Chandrakant Zagade’s birthday

सत्काराला उत्तर देताना श्री. चंद्रकांत झगडे यांनी सर्व मान्यवर, सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या शैक्षणिक वाटचालीत साथ देणाऱ्या सर्वांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही शिक्षण आणि समाजकार्यासाठी तितक्याच निष्ठेने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. Chandrakant Zagade’s birthday

Tags: Chandrakant Zagade's birthdayGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet17
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.