ग्रामदेवता श्री दशरथ काळिश्री, सरपरी देवतांचे शिंपणे उत्साहात
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील साखरी खुर्द व साखरी बुद्रुक या गावातील ग्रामदेवता श्री दशरथ काळीश्री सरपरी देवीचा शिंपणे उत्सव उत्साहात पार पडला. हा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली जाते. Celebrations of village deities in Sakhari Khurd and Budruk


श्री दशरथ काळीश्री सरपरी ग्रामदेवतेचा जयघोष करत उत्सव साजरा होतो. महिरालपाल येथे होणारी गुलालाची उधळण तसेच दोन्ही ग्रामदेवतेचे ढोलकरी यांची डोक्यावर ढोल घेऊन धावण्याची स्पर्धा व ग्रामदेवतेच्या दोन्ही पालख्या नाचवित आणणे हे दृष्य पाहण्याची भाविकांना वेगळीच पर्वणी असते. श्री सरपरी देवीची पालखी टेपवाडीतील मानकरी यांच्या घरी नैवेद्यासाठी स्थानापन्न होते. तेथे तिचे पूजन केले जाते. सुवासिनी देवीची खणा नारळाने ओटी भरतात व कुटुंबासाठी आशीर्वाद मागतात. तिथून वाजत-गाजत ढोलाच्या गजरात नाचवत पालखी आणली जाते. Celebrations of village deities in Sakhari Khurd and Budruk


श्री दशरथ काळिश्री देवीची पालखी सहानेवरून वाजत-गाजत आणली जाते. ढोल वादकांची दौड हे उत्सवाचे विशेष आकर्षण असते. दोन्ही पालख्या नाचविण्याचा आनंद भाविक घेतात. दोन्ही देवतांच्या पालख्या महिरापाल येथे एकत्र येतात. या ठिकाणी लाल गुलालाची उधळण होते. तेथून दोन्ही पालख्या नदीच्या काठावर जाणीवसा या कार्यक्रमासाठी बसवल्या जातात. दोन्ही पालख्यांचे मानकरी रुखवात घेऊन येतात. तसेच तिथे रुखवाताचा विधी पार पडतो. त्याठिकाणी लग्नातील जाणीवसा कार्यक्रमही पार पडतो. Celebrations of village deities in Sakhari Khurd and Budruk
त्यानंतर दोन्ही पालख्या मंदिरासमोर तुळशीच्या शेजारी चौथ-यावर बसवल्या जातात. त्या ठिकाणी श्री देव दशरथ व सरपरी या देवतांचा लग्नविधी कार्यक्रम पार पडतो. दोन्ही पालखीतील नारळाची अदलाबदल होते. त्यानंतर देवीच्या मंदिरा भोवती लग्नाचे पाच फेरे म्हणजेच पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. या प्रदक्षिणामध्ये हजारो भाविक सहभागी होत असतात. दोन्ही पालख्यांचे कोम एकमेकाच्या पालखीला चिकटविली जाते. दोन्ही पालख्या मंदिरात स्थानापन्न करून त्यांचे विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर देवतांचे रूपे उतरविण्याचा कार्यक्रम पार पडतो. एकंदरीत साखरी खुर्द व साखरी बुद्रुक या गावातील श्री देव दशरथ काळीश्री सरपरी या देवतांचा शिंपणे उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. हा कार्यक्रम आनंदाने उत्साहाने व भक्तिभावाने शांततेत पार पडला. Celebrations of village deities in Sakhari Khurd and Budruk

