• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सातबारा फेरफारासाठी लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी रंगेहाथ

by Mayuresh Patnakar
September 3, 2026
in Ratnagiri
535 5
0
Caught red-handed while accepting a bribe
1.1k
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महिनाभरातच दुसऱ्या कारवाईमुळे चिपळूणच्या महसूल विभागात खळबळ

गुहागर, ता. 03 : चिपळूण येथे सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ५ ऑगस्ट रोजी सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले होते. महिना भरातच दुसऱ्या कारवाईमुळे चिपळूणच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे. Caught red-handed while accepting a bribe

तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याचे काम होते. हे काम करून देण्यासाठी मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने सापळा रचला. चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना उमेश राजेशिर्के यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेत खळबळ उडाली असून, सातबारा व फेरफाराच्या कामांसाठी नागरिकांकडून होणाऱ्या कथित लाचेच्या मागण्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. Caught red-handed while accepting a bribe

Tags: Caught red-handed while accepting a bribeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share420SendTweet263
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.