पुन्हा एकदा नामसाधर्म्याचा डाव, 2 गीतेंसह 1 तटकरी रिंगणात
Guhagar News, ता. 20 : Candidates in Raigad Lok Sabha मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (१९ एप्रिल) १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजपर्यंत 28 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये महायुती, महाविकास आघाडी बरोबर वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, लोकराज्य, काँग्रेस यांच्यासह 19 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रमुख उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. Candidates in Raigad Lok Sabha
Candidates in Raigad Lok Sabha मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) तसेच 6 वेळा खासदार राहीलेले व 2019च्या निवडणुकीत पराभुत झालेले अनंत गीते (Anant Geete) महाविकास आघाडीचे उमदेवार आहेत. एकमेकांना पराभुत करण्यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्याची क्लुप्ती हे दोन्ही उमेदवार वापरत आले आहेत. 2014 च्या निवडणुकीत अनंत गीते यांनी हा डाव पहिल्यांदा खेळला होता. त्या निवडणुकीत गीते विजयी झाले. त्यामुळे त्यांचा नामसाधर्म्याचा डाव यशस्वी झाला अशी चर्चा होती. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी देखील अनंत गीतेच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार उभा केला होता. योगायोगाने या निवडणुकीत सुनील तटकरे विजयी झाले. Candidates in Raigad Lok Sabha
पुन्हा एकदा नामसाधर्म्याचा डाव
यावेळी देखील रायगड लोकसभा मतदार संघात अनंत गंगाराम गीते (महाविकास आघाडी) या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेले अनंत पद्मा गिते आणि अनंत बाळोजी गीते अशा दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला आहे. तसेच सुनील दत्तात्रेय तटकरे (महायुती) यांच्या नावाशी साधर्म्य सांगणारा सुनील दत्ताराम तटकरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. Candidates in Raigad Lok Sabha
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुमोदिनी रविंद्र चव्हाण, बहुजन समाज पार्टी (बसपा) तर्फे मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी व अनिल बबन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अनिकेत सुनील तटकरे यांच्यासह 28 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. Candidates in Raigad Lok Sabha
Candidates in Raigad Lok Sabha
१) अनंत पद्मा गिते (1 अर्ज) – अपक्ष
२) अनंत बाळोजी गिते, (1 अर्ज) – अपक्ष
३) अनंत गंगाराम गिते, (१+३ अर्ज) – महाविकास आघाडी, उ.बा.ठा. शिवसेना
४) नितीन जगन्नाथ मयेकर, (1 अर्ज) – अपक्ष
५) आस्वाद जयदास पाटील, (1 अर्ज) – अपक्ष
६) मंगेश पद्माकर कोळी, (1 अर्ज) – अपक्ष
७) प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (2 अर्ज) – भारतीय जवान किसान पार्टी
८) पांडुरंग दामोदर चौले, (1 अर्ज) – अपक्ष
९) सुनिल दत्तात्रेय तटकरे, (4 अर्ज) – महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस
१०) अनिकेत सुनील तटकरे, (1 अर्ज) – राष्ट्रवादी काँग्रेस
११) गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, 4 अर्ज – अपक्ष म्हणून 3 आणि काँग्रेस पक्षातर्फे 1
१२) विजय गोपाळ बना, (1 अर्ज) – अपक्ष
१३) सुनिल दत्ताराम तटकरी, (1 अर्ज) – अपक्ष
१४) निवास सत्यनारायण मट्टपरती, (1 अर्ज) – अपक्ष
१५) अभिजित अजित कडवे, (1 अर्ज) – अपक्ष
१६) अजय यशवंत उपाध्ये, (1 अर्ज) – अपक्ष
१७) अस्मिता एकनाथ उंदिरे, (1 अर्ज) – अपक्ष
१८) अंजली अश्विन केळकर. (1 अर्ज) – अपक्ष
१९) नरेश गजानन पाटील. (1 अर्ज) – अपक्ष
२०) मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी,(1 अर्ज) – बहुजन समाज पार्टी
२१) अमित पाल कवाडे, (1 अर्ज) – अपक्ष
२२) उस्मान बापू कागदी, (1 अर्ज) – अपक्ष
२३) अनिल बबन गायकवाड,(2 अर्ज) – बहुजन समाज पार्टी
२४) मिलिंद काशिनाथ कांबळे, (1 अर्ज) – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
२५) नंदकुमार गोपाळ रघुवीर, (1 अर्ज) – लोकराज्य
२६) भुपेंद्र नारायण गवते, (1 अर्ज) – अपक्ष
२७) कुमोदिनी रविंद्र चव्हाण, (1 अर्ज) – वंचित बहुजन आघाडी
२८) घाग संजय अर्जुन, (1 अर्ज) – अपक्ष