• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 April 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिबिरांचे आयोजन

by Guhagar News
April 24, 2026
in Health
30 0
0
59
SHARES
168
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. श्री. भास्करराव जाधव यांच्या हस्ते होणार उद्घाटन

गुहागर, ता. 24 : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख श्री विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयुष्मान भारत मार्गदर्शन शिबिर आणि आभा कार्ड नोंदणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात उद्या गुहागर येथून होत आहे. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, शृंगारतळी येथे सकाळी १०.०० वाजता या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते आणि मतदारसंघाचे आमदार श्री भास्करराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. Camp on the occasion of the birth centenary of the Shiv Sena chief

शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष हे केवळ एक वर्ष नसून, खऱ्या शिवसैनिकांसाठी हा एक उत्सव आहे आणि हा उत्सव खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी साजरा झाला पाहिजे, याच भावनेतून जिल्हाप्रमुख श्री विक्रांत जाधव यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन केले आहे. शृंगारतळी येथे होणाऱ्या या शिबिराचा लाभ तालुक्यातील सर्व जनतेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. Camp on the occasion of the birth centenary of the Shiv Sena chief

अशाच प्रकारे दि. २७ एप्रिल २०२६ रोजी चैतन्य मंगल कार्यालय रामपूर (चिपळूण) येथे सकाळी १०.०० वाजता आणि २८ एप्रिल २०२६ रोजी क्षुधाशांती हॉटेल, लोटे MIDC रोड, खेड येथे सकाळी १०.०० वाजता अशा प्रकारे ही शिबिरे होणार आहे. Camp on the occasion of the birth centenary of the Shiv Sena chief

Tags: Camp on the occasion of the birth centenary of the Shiv Sena chiefGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.