गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा, वेलदूर नवानगर येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देऊन निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अन्वी जांभारकर हिची विद्यार्थी मुख्यमंत्री, आरुष कोळथरकर याची उपमुख्यमंत्री, तर विविध खात्यांसाठी इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींची मंत्रिपदी निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. Cabinet formed at Veldur Nawanagar School

यावेळी मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या अन्वी जांभारकर हिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गुहागर केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज पाटील, मुख्याध्यापक निलेश पाटील, शिक्षिका सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, धन्वंतरी मोरे तसेच विद्यार्थी उपस्थित होते. Cabinet formed at Veldur Nawanagar School
