• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 April 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये १८ ग्रामपंचायतीच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुका

by Guhagar News
April 3, 2026
in Guhagar
182 2
0
By-elections in Guhagar
357
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीमधील २६ सदस्य पदासाठीच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून खोडदे व चिंद्रावळे ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदाची पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी ७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. By-elections in Guhagar

तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची सदस्य व सरपंचपदे काही कारणाने रिक्त आहेत, अशा १८ ग्रामपंचायतींसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये खोडदे ग्रामपंचायतीचे सरपंच मृत झाल्याने, तर चिंद्रावळे सरपंचांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले. यामुळे थेट जनतेमधून सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर १८ ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या २६ सदस्य पदासाठीची निवडणूक होत आहे. यामध्ये ग्रामपंचायत वेळंब १ जागा, आवरे-असोरे २ जागा, पालकोट-त्रिशुळ, मढ़ाळ, वरवेली प्रत्येकी २ जागा, झोंबडी, खोडदे प्रत्येकी ३ जागा, कौंढर काळसूर, साखरीत्रिशुळ, असगोली, वेलदूर, पांगारीतर्फे हवेली, धोपावे तेटले, परचुरी, सडेजांभारी, चिखली, चिंद्रावळे व वडद येथे प्रत्येकी १ जागेसाठी निवडणूक होणार आहे. ७ ते १३ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. By-elections in Guhagar

Tags: By-elections in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share143SendTweet89
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.