• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 September 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लांब पल्ल्याच्या गाडयांना जेवणासाठी मिळणार अधिकृत थांबा

by Mayuresh Patnakar
September 5, 2026
in Guhagar
149 1
0
Buses from Guhagar depot closed for five hours
292
SHARES
835
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर सभापती आणि उपसभापती यांची यशस्वी शिष्टाई

गुहागर, ता. 05 : गुहागर आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या गाड्या तब्बल पाच तास बंद राहिल्याने विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. सकाळी १० वाजल्यापासून गाड्या न सुटल्याने आगारात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. अनेक प्रवाशांना जेवण-पाण्याविना ताटकळत राहावे लागले. Buses from Guhagar depot closed for five hours

लांब पल्ल्याच्या गाड्यांना जेवणासाठी अधिकृत हॉटेल थांबा नसल्याने चालक-वाहकांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी हॉटेलमध्ये गाडी थांबविल्यास संबंधित चालक व वाहकांवर कारवाई करून दंड आकारला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. या प्रश्नावर कर्मचारी व प्रशासनामध्ये अनेक दिवसांपासून असलेल्या वादाला आज सेवा ठप्प होण्याचे स्वरूप आले. Buses from Guhagar depot closed for five hours

Buses from Guhagar depot closed for five hours

गाड्या सकाळपासून सुटत नसल्याची माहिती मिळताच गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे व सहकाऱ्यांनी तातडीने आगारात धाव घेतली. त्यांनी प्रशासनाला जाब विचारत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वीय सहाय्यक, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन तसेच रत्नागिरी विभाग नियंत्रक यांच्याशी आगारातूनच दूरध्वनीवरून संपर्क साधला.

आगार प्रभारी व्यवस्थापक स्वप्निल शिंदे यांच्याशी चर्चा केली असता सुरुवातीला विद्युत पुरवठा खंडित होणे, जनरेटर नसणे, डिझेल भरण्याची गैरसोय, NCMC कार्डची अडचण आणि वाहक रिबुक होत नसल्याची कारणे सांगण्यात आली. मात्र सभापती व उपसभापती यांनी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांना जेवणासाठी अधिकृत थांबा नसल्याचा मूळ प्रश्न समोर आला. Buses from Guhagar depot closed for five hours

Buses from Guhagar depot closed for five hours

यानंतर सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत शिष्टाई केली. लांब पल्ल्याच्या गाड्यांना जेवणासाठी अधिकृत थांबा देण्याबाबत तसेच यापूर्वी कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई स्थगित करण्याबाबत लेखी पत्र घेण्यात आले. त्यानंतर तब्बल पाच तासांनी गुहागर आगारातून गाड्या मार्गस्थ झाल्या.

गाड्या सुटेपर्यंत सभापती, उपसभापती व सहकारी आगारातच ठाण मांडून होते. गाड्या सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व प्रवाशांची योग्य ती व्यवस्था झाल्याची खात्री करून त्यांनी आगार सोडले. त्यांच्या पुढाकारामुळे वाहतूक सेवा सुरळीत झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य संदिप गोरिवले, कोतळूक ग्रामपंचायतीचे उपसरपंच, भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक, रविंद्र कारकर, जावेद केळकर, सुदर्शन पाटील व अन्य सहकारी उपस्थित होते. Buses from Guhagar depot closed for five hours

Tags: Buses from Guhagar depot closed for five hoursGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.