• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयात पुस्तक प्रदान सोहळा

by Manoj Bavdhankar
July 15, 2026
in Guhagar
135 1
1
Book presentation ceremony at Patpanhale College
265
SHARES
758
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पोलीस दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव

गुहागर ता. 15 : पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या 2012-13 या वर्षातील विद्यार्थीच्या बॅचच्या वतीने ग्रंथालयासाठी सुमारे ₹१५ हजार किमतीची पुस्तके भेट देण्यात आली. याच कार्यक्रमात पोलीस दलात भरती झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कु. आकाश पवार आणि कु. प्रतीक खांडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रतीक खांडेकर हा विद्यार्थी एकाच वेळी तीन पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी विविध विषयांवरील उपयुक्त पुस्तकांचे प्रदान केले. Book presentation ceremony at Patpanhale College

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच उच्च शिक्षणासाठी आवश्यक संदर्भ साहित्य उपलब्ध होणार आहे. पाटपन्हाळे महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आणि पोलीस भरतीमध्ये पुढे यावेत या हेतूने या बॅचने महाविद्यालयाला पुस्तके भेट दिली. यानंतर पोलीस दलात भरती झालेल्या आकाश पवार आणि प्रतीक खांडेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. Book presentation ceremony at Patpanhale College

Book presentation ceremony at Patpanhale College

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. ए. देसाई यांनी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी कायम जपलेले ऋणानुबंध आणि ग्रंथालयासाठी दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. ज्ञानदान हे समाजासाठी सर्वोत्तम योगदान असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. तसेच आकाश पवार आणि प्रतीक खांडेकर यांच्या यशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. Book presentation ceremony at Patpanhale College

या बॅचमधील विद्यार्थी आणि पाटपन्हाळे या गावचे उपसरपंच श्री. असीम साल्हे, अमित कुबडे आणि अश्विनी सरवणकर त्या बॅचचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि समारोप प्रा. डॉ. एस एस खोत यांनी केला. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे ग्रंथपाल धनंजय गुरव, प्रा. सुभाष घडशी, त्रिशला साबळे आणि कांचन कदम उपस्थित होत्या. उपस्थितांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांतील नाते अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली. Book presentation ceremony at Patpanhale College

Tags: Book presentation ceremony at Patpanhale CollegeGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share106SendTweet66
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.