गुहागर, ता. 16 : श्री देव गो कृ माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. Book Exhibition at Guhagar

विद्यालयाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे मुख्याध्यापिका सौ. एस. एस. कांबळे यांनी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सन्मान केला. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. जी. एस. कनगुटकर, माजी मुख्याध्यापक एस. एस. कांबळे, निलेश गोयथळे, पी. बी. जाधव आणि जी. एच. पाडवी उपस्थित होते. वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. Book Exhibition at Guhagar
