गुहागर, ता. 07 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तरक्तदान शिबीर अपरांत हॉस्पीटल चिपळूण येथे संपन्न झाले. रक्तदान शिबीराचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांचे हस्ते प्रतिमापूजन व अपरांत हॉस्पीटलचे संचालक डॉ. अब्बास जबले, डेरवण हॉस्पीटलचे डॉ. सुनिता झुंजारवाड, डॉ. जितेंद्र सप्रे, रवि अग्रवाल तसेच संस्थेचे संचालक मंडळ यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. चिपळूण परिसरातील संस्थेचे ५३ सभासद, कर्मचारी व सेवाभावी नागरीक यांनी रक्तदान करून रक्तदाना सारख्या पवित्र कार्यात सहभाग घेवून संस्थेला सहकार्य केले. Blood donation camp
यावेळी अपरांत हॉस्पीटलचे संचालक डॉ. अब्बास जबले तसेच डेरवण हॉस्पीटलचे डॉ. सुनिता झुंजारवाड यांनी रक्तदानाचे महत्व व गरज याबद्दल मनोगत व्यक्त करून संस्थेने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन केले असल्याचे नमूद करून रक्तदात्यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे रक्तदान शिबीरासाठी सहयोग करणाऱ्या कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय व वैदयकिय महाविदयालय डेरवणचे डॉक्टर व त्यांचा स्टाफ तसेच रक्तदान शिबिरासाठी आरोग्यविषयक सर्व सोयीसुविधांसह हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल अपरांत हॉस्पीटलचे डॉ. यतीन जाधव व त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद दिले. Blood donation camp
संस्थेच्या रक्तदान शिबीराला चिपळूण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती नगरसेवक कपिल शिर्के, पाणी पुरवठा सभापती नगरसेवक निहार कोवळे, वालोपेचे सरपंच प्रतिक सुर्वे तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेकडून ९६ वेळा रक्तदान केलेल्या मिलिंद चितळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. Blood donation camp
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक दिलीप मयेकर, सुहास भोसले, अरूण पाटील, पराग आरेकर, दिलीप वानकरकर, उदय वेल्हाळ, विजय जाधव, संचालिका स्मिता आरेकर, प्रज्ञा नरवणकर अनेक मान्यवर सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आभार संस्थेचे व्यवस्थापक संदिप रहाटे यांनी मानले. Blood donation camp
