• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्करराव जाधव यांचा धमाका

by Ganesh Dhanawade
November 11, 2023
in Guhagar
268 3
0
Blast of MLA Bhaskarrao Jadhav

विकासकामे भूमिपूजन करताना आ. भास्कर जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत व अन्य पदाधिकारी.

526
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरमध्ये २८ कोटींच्या विकासकामांची भूमिपूजने

गुहागर, ता. 11 : मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी तालुक्यात विकासकामांचा धडाका लावला असून साखरीआगर येथील मच्छीमार जेटी, पालशेत बाजारपेठेतील पुलासह सुमारे २८ कोटींच्या विकासकामांची भूमिपूजने त्यांनी गेल्या दोन दिवसांत केली. सत्ता कोणाचीही असली तरी मतदारसंघाचा विकास थांबलेला नाही आणि थांबणारही नाही, हेच त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. Blast of MLA Bhaskarrao Jadhav

Blast of MLA Bhaskarrao Jadhav
विकासकामे भूमिपूजन करताना आ. भास्कर जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत व अन्य पदाधिकारी.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षाच्या, विशेष करून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना एक रूपयांचाही विकास निधी दिला नाही. एवढेच नव्हे तर ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या सर्व विकासकामांवर स्थगिती आणली होती. यामध्ये आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या गुहागर मतदारसंघातील १०० कोटींहून अधिक रकमेच्या कामांचा समावेश होता. परंतु, सरकारने कितीही गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तरी आमदार श्री. जाधव हे मागे हटले नाहीत. त्यांनी न्यायालयीन लढाई लढून सरकारविरूध्द संघर्ष केला आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या कामांवरील स्थगिती उठली. यातील काही कामांबरोबरच अन्य वेगवेगळया माध्यमातून मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने त्यांनी या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये केली. Blast of MLA Bhaskarrao Jadhav

साखरी आगर येथील जेटीचे काम गेले काही वर्ष तांत्रिक अडथळयांमुळे रखडले होते. आमदार श्री. जाधव यांनी विधानसभेत सातत्याने आवाज उठवून आणि मंत्रालय स्तरावर बैठका घेवून या कामाला सुमारे ८ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या कामासह चिंद्रावळे-गराटेवाडी-सलपेवाडी रस्ता (१ कोटी ४२ लाख), वाघांबे-दोडवली-मासू रस्ता (३ कोटी ८० लाख), पोमेंडी आडीवाडी रस्ता (१ कोटी ४७ लाख), नरवण-मुसलोंडी-कर्दे रस्ता (५५ लक्ष), कुडली माटलवाडी रस्ता (५५ लक्ष), आवरे तेलीवाडी बौध्दवाडी रस्ता (५५ लक्ष), पोमेंडी-गोणवली रस्ता (५५ लक्ष), पालशेत-मारूती मंदिर रस्ता (१५ लक्ष), पालशेत बाजारपेठ पूल (६ कोटी), पालशेत मारूती मंदिर नागझरी रस्ता ( १९ लक्ष), पोमेंडी येथे नळपाणी योजना (१ कोटी १७ लाख), पाभरे नळपाणी पुरवठा योजना (६१ लक्ष), पाभरे खुर्द नळपाणी पुरवठा योजना (४० लक्ष), आबलोली नळपाणी योजना (२ कोटी), शिवणे ग्रामदेवता मंदिर मुख्य रस्ता (१५ लक्ष), भातगाव मुख्य रस्ता ते काजुर्ली शंकर कुवारे घर रस्ता (५ लक्ष) या विकासकामांची भूमिपूजने पार पडली. Blast of MLA Bhaskarrao Jadhav

या दौऱ्यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव, पक्षाचे तालुकाप्रमुख श्री. सचिन बाईत, सौ. नेत्रा ठाकूर, श्री. महेश नाटेकर, विनायक मुळये, रविंद्र आंबेकर, सौ. पूनम पाष्टे, सौ. पूर्वी निमूणकर, दत्ताराम निकम, पांडुरंग कापले, शरद साळवी, वनिता डिंगणकर, विजय मोहिते, जगदीश गडदे आदी पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते. Blast of MLA Bhaskarrao Jadhav

Tags: Blast of MLA Bhaskarrao JadhavGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share210SendTweet132
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.