• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपतर्फे शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

by Mayuresh Patnakar
May 11, 2021
in Old News
16 1
0
भाजपतर्फे शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संतोष जैतापकर यांचा पुढाकार, रुग्णसेवतही अग्रेसर

गुहागर, ता. 11 : भाजपतर्फे गुहागर शहरातील तहसीलदार कार्यालय परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोविड युध्दातील नियोजनमध्ये व्यस्त असणाऱ्या प्रशासनाच्या कार्यालयांबरोबरच पोलीस वसाहतीचेही निर्जंतुकीकरण भाजप कार्यकर्त्यांनी केले. यासाठी संतोष जैतापकर यांनी पुढाकार घेतला. तर संजय मालप, शार्दुल भावे, अमर देवाळे, तानाजी कदम, अमर जोशी या कार्यकर्त्यांनी   प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला.  
BJP Workers Sanitize tehsildar office, police station, Police residential colony, Mahapurush Temple, Talathi and Circle Office premises in Guhagar city. Santosh Jaitapkar took the initiative for this. On the other hand, Sanjay Malap, Shardul Bhave, Amar Dewale, Tanaji Kadam, Amar Joshi participated in the actual work.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Covid Second Wave)  आरोग्य यंत्रणेबरोबर (Health Department) पोलीस (police) आणि महसुल (Revenue)  प्रशासनही  महत्त्वाची भुमिका बजावत आहे. आरोग्य विभागाच्या इमारती सातत्याने निर्जतुकीकरण करण्याची व्यवस्था उभी आहे. मात्र महसुल आणि पोलीस प्रशासनाकडे ही यंत्रणाच नाही. ही बाब लक्षात घेवून उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गुहागर शहरातील प्रशासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला. भाजयुमोचे तालुकाध्यक्ष संजय मालप आणि अन्य भाजप कार्यकर्त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली. जैतापकरांनी सोडियम हापोक्लोराईड उपलब्ध करुन दिले. संजय मालप, शार्दुल भावे, अमर देवाळे, तानाजी कदम, अमर जोशी या कार्यकर्त्यांनी   पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यायल, सेतू कार्यालय,  महापुरुष मंदिर आणि संपूर्ण पोलीस वसाहत यांचे निर्जंतुकीकरण करुन दिले. तहसीलदर सौ. लता थोत्रे, पोलीस निरिक्षक अरविंद बोडके यांनी या कामाबद्दल भाजप व संतोष जैतापकर यांचे आभार मानले आहेत. 
संतोष जैतापकर यांनी मुंबईमध्ये विविध रुग्णालयात काम करणाऱ्या कोकणातील रहीवाशांची एक टीम उभी केली आहे. या टिममध्ये , 20 डॉक्टर, 100 पेक्षा जास्त परिचारिका आणि 50 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या टिमद्वारे वसई, विरार, भाईंदर, पालघर या परिसरातील कोरोनाग्रस्त कोकणवासीयांना उपचारांपासून रुग्णांलयात भरती करेपर्यंतची सर्व व्यवस्था केली जात आहे.  (Santosh Jaitapkar built a Team of 20 Doctors, 100 + Sisters and 50 Health Workers. This team is helping to corona positive patients) मध्यंतरी चिंद्रावळे गावात कोरोनाच्या प्रसाराचा वेग वाढला. त्यावेळी तातडीने गावकऱ्यांना 50 सॅनिटायझरच्या बाटल्या आणि 5 ऑक्सिमिटरची भेट संतोष जैतापकर यांनी दिली. (Also Santosh Jaitapkar Gives 5 Oximeter and 50 Sanitizer Bottels to Chindrawale Villegers.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.