बंजारा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
गुहागर, ता. 16 : श्री सेवालाल महाराज कोकण बंजारा संस्था गुहागर यांच्यावतीने श्री संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्सव सोहळा शृंगारतळी मुंढर फाटा येथे शेकडो बंजारा समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीत पार पडला. रविवारी सकाळी पाटपन्हाळे हायस्कूल ते पेट्रोलपंपपर्यंत मिरवणूक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. Birth anniversary of Sevalal Maharaj at Shringartali

या रॅलीमध्ये अनेक महिला उत्स्फूर्तपणे डीजेच्या तालावर आपला ठेका धरत होत्या. या महिलांनी आपला पारंपारिक वेश परिधान केला होता. यावेळी श्री सेवालाल महाराज कोकण बंजारा संस्था गुहागरच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच बंजारा समाजातील शासकीय सेवेमध्ये असणारे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी व अन्य कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच समाजासाठी ज्यांचे सहकार्य सतत मिळत असते त्यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. Birth anniversary of Sevalal Maharaj at Shringartali
बंजारा समाजात परिवर्तनाचा विचार मांडून क्रातिकारी बंजारा समाजाला विधायक कार्य करण्याचीदिशा देणारे संत सेवालाल महाराज यांच्या विचारांकडे सर्व समाज बांधवांनी आशावादी नजरेने पाहिले पाहिजे. कर्नाटकातील मूळ वास्तव असलेला बंजारा समाज हा कोकणात येऊन मेहनतीची कामे करत असतो. आज काळ बदलला. बंजारा समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, जातीच्या दाखल्यांचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात. या सर्व प्रश्नांना तोंड देऊन हा समाज कोकणात मेहनतीची कामे करीत असतो. Birth anniversary of Sevalal Maharaj at Shringartali
