• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पक्षी निरीक्षण : 5 हळद्या (Golden oriole)

by Guhagar News
May 5, 2021
in Old News
48 1
0
पक्षी निरीक्षण : 5  हळद्या (Golden oriole)
95
SHARES
272
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp
@Makarand Gadgil
हळद्या (Golden oriole)
Scientific name = Oriolus oriolus
मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण भारतात आढळतो.  नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाच्या असून  याच्या पंखांचा रंग काळा असतो. तसेच त्याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. चोच फिक्कट गुलाबी असते. मादी दिसायला नरासारखीच पण किंचित फिक्या पिवळ्या रंगाची असते. मादीची चोच काळसर असते. हा पक्षी झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो . फांदीवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच ! पण त्याच्या कर्कश्य आवाजावरून तो लगेच ओळखू येतो .
फुलांमधील मध , विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे . याचे घरटे लहान व कपच्या आकाराचे असून ते गवत तसेच कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थीत विणलेले असते .
विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असून मादी एका वेळी दोन ते तीन पांढऱ्या रंगाची अंडी देते .पिल्लांचे संगोपन व संरक्षण नर व मादी जोडीने करतात.

Tags: Bird WatchingGuhagarGuhagar NewsKonkanLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiTourismकोकणगुहागरगुहागर न्यूजटॉप न्युजताज्या बातम्यापक्षी निरीक्षणपर्यटनमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share38SendTweet24
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.