नवरंग ( Indian Pitta ) Scientific Name = Pitta Brachyura
हा पक्षी दिसायला खूप सुंदर आहे . याला मराठीत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असेही म्हटले जाते. त्याच्याकडे पाहिल्यावरच आपल्याला त्याच्या पंखावर, पिसांवर तांबडा, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, काळा हे रंग दिसून येतात. शिवाय याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना त्याच्या पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात. नवरंग उडतो तेव्हा त्याच्या पंखात लपलेले रंगही दिसून येतात.
हा पक्षी भारतभर सर्वत्र दिसतो. तो भारतातील सर्व वनात आणि झुडपी प्रदेशात आढळतो. पक्षातील नर व मादी दिसायला सारखेच असतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून भुंडया शेपटीचा आहे. झुडपी जंगलात राहणे पसंत करणारा हा पक्षी आपला बहुतेक वेळ जमिनीवर घालवतो. त्याचा ‘ व्हीट – टयू’ असा आवाज सकाळ संध्याकाळ ऐकू येतो. हा ढगाळ हवेत दिवसभर आवाज करतो. त्याची शीळ लांबवर ऐकू येते. याचा वीणीचा काळ ऑगस्ट ते मे असून गवत ,झाडाची मुळं, काडया यांपासुन बनविलेल्या घरटयात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. विविध प्रकारचे किटक हे त्याचे मुळ खादय आहे.
बालमित्रानों चला आता नवरंग या पक्षाची चित्र काढा, त्याची शीळ ऐका, तुम्हाला त्याच्यासारखी शील घालता येते का पहा, त्याचे रेकॉर्डिंग करा आणि Innovation Competition साठी पाठवून द्या. तुम्ही पक्षांच्या पुस्तकांत, गुगलवर या पक्षाची आणखी माहिती शोधा आणि पुढील तीन दिवसात या बातमीच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका.