• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 October 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निधी देण्याबाबत गुहागर वर अन्याय होणार नाही

by Manoj Bavdhankar
October 8, 2026
in Guhagar
63 1
0
Bhumipujan ceremony at Guhagar
124
SHARES
354
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्कर जाधव

गुहागर, ता. 08 : निधी देण्याबाबत गुहागरवर अन्याय होणार असेल तर मी गप्प बसणार नसून आमच्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी सातत्याने मी पाठपुरावा करणार, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. जिल्हा नियोजन मंडळातून गुहागर शहरासाठी मंजूर झालेल्या १ कोटी निधीतून विविध कामांचे भूमीपूजन आ. भास्कर जाधव यांच्याहस्ते  झाले. त्यावेळी ते बोलत होते. Bhumipujan ceremony at Guhagar

यावेळी नगरसेवक समीर बागकर, नगरसेविकास श्रिया मोरे, विनायक मुळे, पद्माकर आरेकर, राज विखारे, विनायक जाधव, धनंजय खातू, जयदेव मोरे, कल्पेश बागकर, विनायक बारटक्के, संतोष गुहागरकर  यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Bhumipujan ceremony at Guhagar

यावेळी बोलताना आ. जाधव म्हणाले, गुहागर नगरपंचायतमध्ये असं कोणतंही एक काम शिल्लक ठेवलेलं नाही. सरसकट सगळी कामे केलेली आहेत. कार्यकर्त्यांनी मागितलेली सगळी कामे मंजूर केलेली आहेत. मी नगर विकास मंत्री असताना गुहागरसह जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमध्ये भरघोस प्रमाणात निधी मी आणलेला होता. फायर फायटर गुहागरला 24 तास पाणी योजना मी मंजूर केला होत्या, परंतु त्या अद्याप झालेल्या नाहीत.  गुहागर शहरातील अनेक शेतात जाणाऱ्या वाटा, अंगण पेवर ब्लॉक पिवर ब्लॉकने आम्ही सजवले आहेत. Bhumipujan ceremony at Guhagar

Bhumipujan ceremony at Guhagar

जिल्हा नियोजनमधून नगरविकास विभागाला निधी कधी मिळतच नव्हता. कै. अजित पवार यांनी अर्थमंत्री झाल्यानंतर जनसुविधेअंतर्गत निधी ग्रामीण भागाला मंजूर झाला. ज्या शहरांची लोकसंख्या अधिक असते त्यांना हा निधी मिळण्याचा अधिकार असतो. गुहागरला हक्काचा हा निधी मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुहागर समुद्रकिनारी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय हा माझ्या कारकिर्दीत झाला होता. त्यानंतरच्या काळात हा निर्णय बंद झाला. कोकण किनारपट्टीत सातत्याने दुर्घटना घडत असल्याने तेथे सुरक्षारक्षक सरकारने नेमणे आवश्यक असून मी यासाठी पाठपुरावा करणार आहे. गुहागरसह संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यासाठी मी सरकाकडे आग्रह धरला असल्याचे त्यांनी सांगितले. Bhumipujan ceremony at Guhagar

आज गुहागर लक्ष्मी नारायण मंदिर येथे बसण्यासाठी आसने, जीवन शिक्षण शाळा येथील बांधला बांधी घालणे व शौचालय बांधणे, जीवन शिक्षण शाळा येथे शेड बांधणे, किर्तनवाडी सार्वजनिक विहीर ते जनार्दन भागडे घरापर्यंतच्या पाखाडीचे काँक्रीटीकरणे करणे, गुहागर किर्तनवाडी सेवा मंदिर चव्हाटा सुशोभिकरण करणे, गुहागर कुंभारवाडी पाखाडी ते गजानन साळवी पाखडीला चेकर स्टाईल बसविणे, गुहागर कुंभारवाडी साळवी घर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड पाखाडी काँक्रीटीकरण करणे. गुहागर मनोज बोले घराजवळील पाखाडी, कुलस्वामीनी चौक येथील रस्त्याला बांधी घालणे, देवपाट रामेश्वर स्मशानभूमी रस्ता, गुहागर स्वयंभू महागणपती मंदिर ते शिगवण घर रस्ता डांबरीकरण करणे आदी कामांची भूमीपूजन करण्यात आले. Bhumipujan ceremony at Guhagar

Tags: Bhumipujan ceremony at GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet31
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.