गगनगिरी महाराजांचे पंतू श्री.संजू दादा पाटणकर यांचे हस्ते सर्वांचा सन्मान
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शिवतेज मित्र मंडळ खोडदे व परमपूज्य गगनगिरी देवस्थान खोडदे यांच्या वतीने गगनबावडा गडावरती कोजागिरी पौर्णिमा व भाग्यदिप प्रज्वलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गगनगिरी महाराजांचे पंतू श्री.संजू दादा पाटणकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. Bhagyadip Lighting Ceremony at Khodde


यावेळी सकाळी होमवन, महाआरती व भजने असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजता श्री. संजू दादा यांच्या आदेशाने शिवतेज व परमपूज्य गगनगिरी देवस्थान खोडदे यांचे वतीने सुसंगित भजन करण्यात आले. तसेच गायक बुवा श्री. विनायक गुरव, मृदुंग वादक श्री. कमलाकर गुरव, श्री. विलास गुरव, कुमार विराज गुरव, चकवा वादक श्री.संतोष मुलू गुरव, झांज वादक श्री.संतोष गुरव, सहकारी श्री. भिकाजी गुरव, श्री. महेश साळवी, श्री. संतोष गुरव, कुमारी पूजा गुरव, पुनम गुरव, मानसी गुरव, स्वागम गुरव, मीरा गुरव या सर्वांचा सन्मान परमपूज्य गगनगिरी महाराज यांचे पंतु माननीय श्री. संजू दादा पाटणकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी सर्वांच्या डोक्यात टोपी घालून करण्यात आला. Bhagyadip Lighting Ceremony at Khodde


यावेळी गडावर रांगोळ्या व दहा हजार दिवे लावण्यात आले होते. त्यात सर्व शिवतेज मित्र मंडळाच्या सदस्यांनी भाग घेतला होता. नंतर परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या प्रतिमेची चांदीच्या पालखीतून गडावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या पालखीचा, पूजेचा व आरतीचा मान परमपूज्य गगनगिरी देवस्थान खोडदे यांना कुमारी पूजा गुरव, पुनम गुरव व मानसी गुरव यांना मिळाला. काकडा ज्योती मान श्री.संतोष गुरव, श्री.संतोष मुलू गुरव, श्री. संतोष रघुनाथ गुरव यांना मिळाला. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री १२ वाजता गडावर शेकडो भक्तांचे उपस्थितीत देवतांचे पूजन करून चंद्र बघण्याचा व भक्ती रसाचा गरबा नृत्य संपन्न झाला. गडावरील देवस्थानाचे सर्वस्व परमपूज्य गगनगिरी महाराज यांचे पंतु श्री. माननीय संजू दादा पाटणकर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. Bhagyadip Lighting Ceremony at Khodde

