गुहागर, ता. 16 : बोरोसील (Borosil) कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुहागर शहरातील माझी वसुंधरा अभियानांतर्गत वरचापाट परिसरातील समुद्राची स्वच्छता (Beach cleaning by Borosil) केली. सीएसआर फंडातून समुद्र स्वच्छतेसाठी आधुनिक उपकरणे देण्याबाबत कंपनीने तयारी दर्शविली आहे. या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल गुहागर नगरपंचायत आणि स्वच्छता कर्मचारी यांनी सहकार्य केले. त्याबद्दल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पाटणकर यांनी सर्वांचे आभार मानले. Beach cleaning by Borosil
बोरोसील (Borosil) कंपनीच्या प्रयोगशाळा आणि औद्योगिक उत्पादन विभागाचे अधिकारी डिसेंबरमध्ये गुहागर भेटीसाठी आले होते. त्यावेळी येथील लांबलचक किनारा त्यांना आवडला. याचवेळी समुद्रकिनाऱ्यावरील काही भाग अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी नगरसेवक समीर घाणेकर आणि मँगो व्हिलेजचे मालक समीर काळे यांच्याजवळ स्वच्छता मोहिमेबद्दल चर्चा झाली. (Beach cleaning by Borosil)
Beach cleaning by Borosil
त्यानंतर मार्च महिन्यात या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पाटणकर यांनी गुहागरमध्ये प्रयोगशाळा आणि औद्योगिक उत्पादन विभागाचे दोन दिवसीय कार्यालयीन प्रशिक्षणाचे आयोजन केले. त्या प्रशिक्षणाला 40 अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत वरचापाट परिसरातील समुद्रकिनाऱ्याची संपूर्ण स्वच्छता केली. जमा केलेला कचरा गुहागर नगरपंचायतीच्या कचरा गाड्यांद्वारे कचरा व्यवस्थापक प्रकल्पात पाठवला. Beach cleaning by Borosil
कंपनीच्या या उपक्रमामध्ये गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल (Mayor Rajesh Bendal), नगरसेवक समीर घाणेकर, संजय मालक (Councilor Sameer Ghanekar, Sanjay Malik), हॉटेल व्यावसायिक शामकांत खातू, पर्यटन प्रेमी अतुल फडके आदी सहभागी झाले होते. (Beach cleaning by Borosil)
या उपक्रमानंतर अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांची भेट घेतली. साडेसात किलोमिटर लांबीचा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्यबळाबरोबर आधुनिक उपकरणांची जोड देण्यावर यावेळी चर्चा झाली. नगरपंचायतीने प्रस्ताव पाठवल्यास कंपनीच्या सीएसआर फंडातून त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करु. असे बोरोसीलचे (Borosil) अधिकारी पाटणकर यांनी नगराध्यक्षांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. (Beach cleaning by Borosil)