उद्यापासून देशभरातील बँका नियमित सुरू; ग्राहकांना मोठा दिलासा
मुंबई, ता. 28 : बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप व आंदोलनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व बँका नियमितपणे सुरू राहणार असून, बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Bank employees’ strike called off
संपामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संबंधित संघटनांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बँकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती समोर आली आहे. रोख व्यवहार, धनादेश, कर्जविषयक कामकाज तसेच इतर बँकिंग सेवांसाठी ग्राहकांना आता बँकांमध्ये जाता येणार आहे. Bank employees’ strike called off
