जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; ग्रामसेवक, मुख्याधिकारी यांना धरणार जबाबदार
गुहागर, ता. 26 : देशभरात घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात नवीन धोरण आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू करण्यात आले आहेत. या नवीन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले असून या अंतर्गत नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींच्या हद्दीत कचरा जाळण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. Ban on burning garbage
नवीन कायद्यानुसार, कोणत्याही अनधिकृत ठिकाणी कचरा टाकणे किंवा तो उघड्यावर जाळणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. असा कचरा तातडीने हटवून वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्लॅस्टिक, बागेतील कचरा आणि इतर ज्वलनशील कचरा उघड्यावर जाळणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. याशिवाय स्थानिक स्वराज्य उ संस्थांनी त्या त्या शहरात व गावात नियमित गस्त घालणे, सीसीटीव्ही बसवणे आणि जनजागृती मोहीम राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. Ban on burning garbage
देशातील नवीन घनकचरा व्यवस्थापन धोरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व ग्रामसेवक यांना कडक आदेश जारी केले आहेत. नगरपरिषद व ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनावर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मुख्याधिकारी व ग्रामसेवकांना जबाबदार धरले जाणार आहे. Ban on burning garbage
