सन २०२५-२६ आर्थिक वर्षात ३८ लाख निव्वळ नफ्यासह ९७.२०% वसूली
गुहागर, ता. 08 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने 31 मार्च 2026 अखेर अखेर संस्थेचा एकत्रित व्यवसाय ४० कोटी १७ लाखांपर्यंत पोहोचला आहे. ठेवी २३ कोटी ८९ लाख, कर्ज वितरण १६ कोटी २८ लाख, आणि गुंतवणूक ९ कोटी ४४ लाख इतकी झाली आहे. ९७.२०% वसुली, ३८ लाखांहून अधिक निव्वळ नफा, आणि अत्यल्प १.८४% नेट NPA हे दाखवतात की आपण फक्त वाढलो नाही, तर योग्य मार्गाने, प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्धपणे वाढलो आहोत. अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली. Balance Sheet of Kharvi Credit Union
संतोष पावरी म्हणाले की, व्यवसाय वृद्धीचा विचार करता, खेळते भांडवल २४.१७% ने वाढले, स्वनिधी २१.४७% ने वाढला, ठेवी २५.०३% ने वाढल्या, कर्ज वितरण ३२.५८% ने वाढले, गुंतवणूक ११.९१% ने वाढली, निव्वळ नफा १७.९६% ने वाढला. मला अभिमान वाटतो की, या संस्थेच्या माध्यमातून आपण समाजातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला, त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद पाहिला. ही प्रगती आहे आपल्या प्रत्येक सभासदाची, प्रत्येक ठेवीदाराची, प्रत्येक कर्मचाऱ्याची आणि प्रत्येक सहकाऱ्याची. Balance Sheet of Kharvi Credit Union
संस्थेच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे संचालक, कर्मचारी जिल्हा समन्वय समिती मंडळ व तज्ञ संचालक या सर्वांच्या परिश्रमामुळे हे यश अल्पकालावधीत संस्थेने मिळविले आहे. Balance Sheet of Kharvi Credit Union
