• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 June 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण विधान परिषदेत बाळ माने यांची माघार

by Manoj Bavdhankar
June 4, 2026
in Old News
78 1
0
Bal Mane withdraws from Konkan Legislative Council
154
SHARES
440
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 04 : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. विशेष म्हणजे बाळ माने हे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी अधिकृतपणे माघार घेतली. Bal Mane withdraws from Konkan Legislative Council

यापूर्वी अपक्ष उमेदवार जुईली दळवी तसेच शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे आता या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे हे एकमेव उमेदवार उरले आहेत. यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून त्यांची निवड बिनविरोध  मानली जात आहे. Bal Mane withdraws from Konkan Legislative Council

दरम्यान, बाळ माने यांच्या माघारीमुळे कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात असून, माने यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. कोकण विधान परिषद निवडणुकीतील या नाट्यमय घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणात घडल्या आहेत. Bal Mane withdraws from Konkan Legislative Council

Tags: Bal Mane withdraws from Konkan Legislative CouncilGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.