बजरंग दलाने गुहागरच्या तहसीलदार आणि पोलीसांना दिले निवेदन
गुहागर, ता. 17 : काश्मिर घाटीमध्ये सातत्याने हिंदूंच्या हत्या होत आहेत. जिहादी आतंकवादातून भारताच्या अखंडत्वाला बाधा पोचविण्याचे , काश्मिर घाटी रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न होत आहे. ऑक्टोबर महिन्यात सात भारतीयांच्या हत्या झाला. नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या झाली. या घटनांवर तीव्र चिंता आणि आक्रोश व्यक्त करतो. केंद्र सरकारने जिहादी आतंकवादाचा पूर्णत: विनाश करावा. तसेच हिंदुंना काश्मिर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित करावी. असे निवेदन गुहागरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुहागरच्या तहसीलदार आणि पोलीस निरिक्षक जाधव यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, हिंदुच्या काश्मिर घाटीत पुनर्स्थापनेशिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे. भारताच्या एकतेवाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश कृत संकल्प आहे. जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर दे आम्ही योग्य पध्दतीने जाणतो. बजरंग दल आणि विश्र्व हिंदू परिषेदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे. आतंकवादाचा राजनैतिक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या जिहादी पाकिस्तान वर अंकुश लावण्याकरिता विश्र्व समुदायाने पुढे यावे. अशी मागणी व आवाहन आम्ही करत आहोत. बलीदानी हिंदू व शिख यांच्या परिवारासोबत आम्ही मन:पूर्वक संवेदना प्रकट करत आहोत. विश्र्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता व संपूर्ण हिंदू समाज पिडीत परिवारांसोबत उभा आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारत विषारी सापांची, नागांची फणी ठेचण्याची परंपरा विसरलेला नाही. त्यांचा बंदोबस्त करणे आम्हाला माहिती आहे. आता भारताच्या हातूनच जिहादी आतंकवादाचा समूळ नायनाट होईल. तो होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. या करीता आम्ही कृत संकल्पीत आहोत.
हे निवेदन विश्र्व हिंदू परिषदेचे गुहागर प्रखंडाचे अध्यक्ष प्रकाश आत्माराम सोलकर, मंत्री बबन कुंभार आणि बजरंग दल संयोजन अजय नागवेकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी गुहागरच्या तहसीलदार आणि गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.