• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’द्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

by Manoj Bavdhankar
July 22, 2026
in Ratnagiri
122 1
0
Awareness through 'Mission Rising Flowers'
239
SHARES
682
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी पोलीस दलाचा उपक्रम; सायबर सुरक्षा, अमली पदार्थ प्रतिबंध व स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन

रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘Mission Rising Flowers’ या उपक्रमांतर्गत मुकुल माधव विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. Awareness through ‘Mission Rising Flowers’

Awareness through 'Mission Rising Flowers'

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी मुकुल माधव विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षा, मिशन फिनिक्स अंतर्गत अमली पदार्थांविरोधातील जनजागृती, वाहतूक शिस्त, गुड टच–बॅड टच, स्वसंरक्षण तसेच करिअरच्या विविध संधी याविषयी सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना सुरक्षित, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. Awareness through ‘Mission Rising Flowers’

Awareness through 'Mission Rising Flowers'

दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महमुनी यांनी पटवर्धन हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना याच विषयांवर मार्गदर्शन करत त्यांच्याशी संवाद साधला. ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, अमली पदार्थांविषयी जागरूकता, वाहतूक नियमांचे पालन, वैयक्तिक सुरक्षितता, स्वसंरक्षण आणि करिअर मार्गदर्शनाबाबत आत्मविश्वास निर्माण करून त्यांचे सुरक्षित, सशक्त आणि उज्ज्वल भविष्य घडविणे हा आहे. Awareness through ‘Mission Rising Flowers’

Tags: Awareness through 'Mission Rising Flowers'GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.