गुहागर, ता. 30 : शहरामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय, NSS विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती करत अमली पदार्थाचे दुष्परिणाम पथनाट्याच्या मार्फत कथन केले. Awareness raising through street plays in Guhagar
गुहागर पोलीस ठाणे व महसूल खात्याच्या समोरील मोकळ्या जागेत पोलीस निरीक्षक सचिन सावंत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रामेश्वर सोळंके, गुहागर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. एस. कांबळे, पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ‘मादक पदार्थांनी केला आयुष्याचा घात’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी अमली पदार्थाच्या सेवनाने होणारे वैयक्तिक, कौटुंबिक, नैतिक सामाजिक, आर्थिक दुष्परिणाम, बाबत प्रभावी जनजागृती करताना नागरिकांना अमली पदार्थांचे सेवन न करण्याचे आवाहन केले. Awareness raising through street plays in Guhagar


या पथनाट्यास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. आर. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक श्री सचिन सावंत यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. तसेच उपस्थित पदाधिकारी आणि नागरिकांनीही अशा प्रकारच्या पथनाट्याची आजच्या काळात खऱ्या अर्थाने गरज असल्याचे सांगून महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. Awareness raising through street plays in Guhagar

