मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण
Guhagar News, ता. 17 : गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश शेटे यांना स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्काराने तर खामशेतचे सरपंच मंगेश सोलकर यांना स्व. वासुदेव निमकर कार्यशील सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे (Maharashtra) सार्वजनिक बांधकाम (Minister of PWD, Food, Civil Supplies, and Consumer Protection of Maharashtra), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, सन्मानिका आणि मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. Award distribution ceremony

शनिवारी 15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी गुहागर तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा गुहागरच्या पोलीस परेड मैदानावर संपन्न झाला. यानिमित्ताने पत्रकार संघाने जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाल्यावर भैरी चंडिका प्रसन्न पालखी नृत्य पथक शिरवली, ता. चिपळूण यांनी पालखी नृत्य सादर केले. त्यानंतर पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळा (Award distribution ceremony) संपन्न झाला.

या सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष केदार साठे, उपाध्यक्ष व दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, उदयोजक राजन दळी, पुरस्कारार्थी मंगेश सोलकर, राजेश शेटे, सौ. शेटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर व्यासपीठावर उपस्थित होते. Award distribution ceremony
Award distribution ceremony
कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तीन महिने भोजन (food donation)पुरविण्याचे काम राजेश शेटे आणि त्यांच्या परिवाराने केले. याशिवाय कोरानाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारांसाठी गुहागर नगरपंचायतीला जळावू लाकडे उपलब्ध करुन दिली. हॉटेल व्यवसाय बंद असताना, विपरीत परिस्थितीत संकटात सापडलेल्या जनतेला आधार देणाऱ्याचे काम राजेश शेटे परिवाराने केले. त्याच्या या कार्याचा गौरव म्हणून गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते राजेश शेटे व त्यांची पत्नी यांना शाल, श्रीफळ, सन्मानिका आणि मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. Award distribution ceremony

खामशेतचे सरपंच मंगेश सोलकर यांनी विविध वैयक्तिक लाभाच्या योजना ग्रामस्थांपर्यंत पोचवल्या. 80 हेक्टर जमीनीवर फळबाग लागवड, भात पिक विमासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन, 100 टक्के महसुल संकलन, प्रत्येक घरात शौचालय, शाळेतील विद्यार्थीसाठी स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामस्थांच्या सहभागातून 75 लाखांची कामे केली. खामशेत हे जिल्ह्यातील पहिले शोषखड्डे युक्त गाव (ODF Plus Village) आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्वाधिक कामे केली. येथील एकही ग्रामसभा गेल्या 10 वर्षात तहकुब झालेली नाही. या कामांमुळेच खामशेत ग्रामपंचायतीला निर्मल ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका व जिल्हास्तरावर ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवला. आर.आर.पाटील सुंदर गाव, स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला. सरपंच म्हणून त्यांनी ग्रामविकासाच्या केलेल्या कार्याबद्दल मंगेश सोलकर यांना गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्व. वासुदेव निमकर कार्यशील सरपंच पुरस्कार देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगेश सोलकर यांना शाल, श्रीफळ, सन्मानिका आणि मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. Award distribution ceremony

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पत्रकार संघाचे सचिव निलेश गोयथळे यांनी केले. तर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश धनावडे आणि सत्यवान घाडे यांनी राजेश शेटे व मंगेश सोलकर यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. नगराध्यक्ष राजेश बेंडल, डॉ. विनय नातू, निमकर कुटुंबाचा प्रतिनिधी, आवरे असोरे गावाचे प्रतिनिधी घडशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आभार मानताना पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर यांनी पुरस्काराची निवड कोणत्या निकषांवर केली ते सांगितले. Award distribution ceremony

