सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर, नोव्हेंबरमध्ये वितरण
गुहागर, ता. 26 : श्री दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानतर्फे बाळासाहेब लबडे यांच्या “चिंबोरे युद्ध” कादंबरीला ‘उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ₹5,000’, सन्मानपत्र, आणि सन्मान चिन्ह असे आहे. या पुरस्काराचे वितरण नोव्हेंबर मध्ये मुंबईमध्ये मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे असे पुरस्काराचे आयोजक श्री आनंदकुमार सांडू यांनी जाहीर केले आहे. Award announced for Chimbore war novel
या कादंबरीत रूपकांच्या सुंदर बांधणीने समकालिन सामाजिक व राजकीय वास्तव उभे केले आहे. सध्याच्या समाजातील राजकीय परिस्थितीवर अतिशय मार्मिक व परखड भाष्यात भाष्य केले आहे. या कादंबरीमध्ये स्वप्न, वास्तव आणि फॅन्टसी या तिन्ही घटकांचा एकत्रित वापर करून फ्रेम केलेली अनेक तर्हांमध्ये गुंतलेली कथा तयार करण्यात आली आहे . बाळासाहेब लबडे यांनी खाडी परिसराखालील पाण्याच्या आतल्या जगाचे अद्वितीय चित्रण केले आहे, ज्यामुळे कलात्मक संघर्ष आणि राजकीय उलथापालथ यांचा सुंदर संगम मिळतो. Award announced for Chimbore war novel

शासन, विरोध, अस्तित्व संघर्ष या सर्व सामाजिक-राजकीय पैलूंवर येणाऱ्या परिवर्तनांतून जाणाऱ्या व्यक्तीची मन:स्थिति व वर्तणूक यांचा समावेश या कादंबरीत आहे, ज्यात राजकीय श्रद्धा आणि नैतिक ताण-ताणलेले दृश्य उलगडते. Award announced for Chimbore war novel
त्यांच्या या यशामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या कादंबरीवर आत्तापर्यंत दिग्गज समीक्षकांनी समीक्षण केलेले आहे. यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक श्री दामोदर मावजो, डॉ.दीपक बोरगावे, सुहासिनी कीर्तीकर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, दा गो काळे आदींचा समावेश आहे. या कादंबरीस चांदवडी रूपय्या वाड्मय पुरस्कार, नाशिक.कै.मारोतराव नारायणे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, वर्धा. स्मृतीशेष चमेली भाऊराव स्मृती उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार जळगाव असे आत्तापर्यंत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एबीपी माझा ने त्यांची स्वतंत्र मुलाखत “आनंदाचे पान” या सदरात प्रसारित केलेली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महाराष्ट्र टाइम्स, सामना, सकाळ, दैनिके व इतर नियतकालिकांमधून यावरील परीक्षणे प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या या यशामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. Award announced for Chimbore war novel