संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कौंढर काळसूर या ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री.अविनाश प्रभाकर जाधव यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. Avinash Jadhav as Tantamukti President


श्री.अविनाश प्रभाकर जाधव यांनी यापूर्वी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामसुरक्षा दल, शाळा व्यवस्थापन समिती व तंटामुक्ती समिती मध्ये वीस वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे. बिनविरोध निवड झाल्याबद्दल कौंढर काळसूर पंचक्रोशीत श्री. अविनाश प्रभाकर जाधव यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Avinash Jadhav as Tantamukti President

